पुणे | प्रतिनिधी

बारावीची लेखी परीक्षा येत्या २३ एप्रिल ते २१ मे दरम्यान होणार असून ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. याबाबतची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. आता येत्या शनिवारपासून बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन हॉल तिकीट दिले जाणार आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेची प्रवेशपत्रे म्हणजेच हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या   www.mahahsscboard.in  या संकेस्थळावर येत्या शनिवारपासून College login मध्ये download करण्याकरिता उपलब्ध होतील. या संदर्भात जर काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

हॉल तिकीट घेण्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेतले जाणार नाही आहे. जेव्हा हॉल तिकीट मिळेल, त्यावर मुख्याध्यापकांचा किंवा प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी. हॉल तिकीटमध्ये विषय आणि माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्यावयाच्या आहेत. हॉल तिकीटावर फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करून त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवायची आहे. जर हॉल तिकीटवर फोटो चुकीचा असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्यमाध्यापक किंवा प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे.

 

हॉलतिकिटबाबत मंडळाच्या सूचना

 

 

  • सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी ऑनलाइन हॉलतिकिट प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावीत
  • प्रिंटसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही वेगळे शुल्क आकारु नये
  • प्रिंटवर मुख्याध्यापकांचा किंवा प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी
  • हॉलतिकिटमध्ये विषय, माध्यम बदल असेल तर दुरूस्तीसाठी कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जावे
  • फोटो, सही, नाव यासंदर्भात दुरूस्ती असल्यास महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करून त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवावी
  • हॉलतिकिट गहाळ झाल्यास संबंधित महाविद्यालयांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने Duplicate असा शेरा द्यावा
  • फोटो खराब असल्यास नवीन फोटो लावून संबंधित मुख्याध्यापक,प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावी

राज्यात वाढत्या कोरोना प्रकोपामुळे दहावी बारावीच्या परीक्षा घेण्याचं आव्हान सरकारसमोर होतं. मात्र शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी परीरा या ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचं जाहीर केले आहे. त्यामुळे बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे या कालावधीत होणार आहे. तर दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे या कालावधीत होणार आहे. प्रॅक्टिकल परीक्षा ही लेखी परीक्षेनंतर होणार आहे. याचबरोबर लेखी परीक्षेसाठी 30 मिनिटांचा अधिक वेळ देण्यात आला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रत्येक तासासाठी 20 मिनिटांचा वेळ वाढवून दिला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

  •  

 

 

 

 

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.