नवी दिल्ली :
1 एप्रिलपासून तुमच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत अनेक वस्तू महागणार आहेत. दूध, वीज आणि प्रवास सर्वकाही महाग होईल. आतापर्यंत केवळ कंपन्या महागाईन सहन करत होत्या. आता त्यांनी हा भार ग्राहकांच्या डोईवर दिलाय. महागाई कसे तुमचे खिसे कापण्याच्या तयारीत आहे,
हे जाणून घेऊया
वाहन महागणार
मारुति सुझुकीसह जवळपास सर्वच ऑटो कंपन्यांनी 1 एप्रिल 2021 पासून कार आणि बाइकच्या किमतीत वाढ झाली आहे. दरवाढी मागे कंपन्यांना करावी लागणारी मोठी गुंतवणूक हे कारण दिलं जात आहे. मारुति सुझुकीसह Nissan आणि रेनॉ च्या कार देखील 1 एप्रिलपासून महागणार आहेत. हीरो ने टू-व्हीलरच्या किमती वाढवणार असल्याची घोषणा केली आहे. तर शेतकऱ्यांना देखील फटका बसणार आहे कारण ट्रॅक्टरच्या किमतीही वाढणार आहेत.
टीव्ही महागणार
1 एप्रिल 2021 पासून टीव्ही खरेदी करताना ज्यादा पैसे लागणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून टीव्हीचे दर सातत्याने वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. 1 एप्रिल 2021 पासून टीव्ही 2000 रुपयांपासून 3000 रुपयांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज आहे. चीनच्या वस्तू आयात करण्यावर निर्बंध आणल्यानंतर टीव्हीच्या किमती वाढल्या आहेत.
मोबाइल फोनही होणार महाग
मोबाइल महागाईच्या मोडवर
1 एप्रिलपासून मोबाइलही महागणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसकल्प मांडताना इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर इंपोर्ट ड्यूटी वाढवणार असल्याची घोषणा केली. ज्यामध्ये मोबाइल पोर्ट्स, मोबाइल चार्जर, अॅडॅप्टर, बॅटरी आणि हेडफोन वगैरे गोष्टींचा समावेश आहे. इंपोर्ट ड्यूटीत वाढ करण्यात येणार असल्याने प्रीमियम रेंजचे स्मार्टफोन अधिक महागणार आहेत.
AC ही महागण्याची शक्यता
उष्णतेच्या झळा सुरू झाल्यावर AC च्या गार वाऱ्याची गरज भासते. मात्र यंदा एसीही महगण्याची शक्यता असल्याने ग्राहकांना गार हवेसाठी अधिक पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. रेफ्रिजरेटर म्हणजेच फ्रीज देखील महागण्याची शक्यता आहे. कच्च्या मालाच्या किंमती वाढल्याने एसी-रेफ्रिजरेटर महागणार असल्याची शक्यता आहे. एसीच्या दरात 1500 रुपयांपासून 2000 रुपयांपर्यंत दर वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात ग्लोबल मार्केटमध्ये ओपन-सेल पॅनलच्या दरात 35 टक्के वाढ झाली आहे.
वीम्याचा हफ्ता वाढण्याची शक्यता
वीमा कंपन्या 1 एप्रिलपासून टर्म इंश्योरेंस प्रीमियम महाग करण्याच्या तयारीत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार नवे आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये टर्म इंश्योरेंसच्या हफ्त्यात 10 ते 15 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. कोरोना संकटाच्या काळात वीमा कंपन्यांची गुंतवणूक आणि खर्च बराच वाढला आहे. टर्म पॉलिसीमध्ये पूर्णपणे जोखिम कव्हर केली जाते. यामध्ये मॅच्युरिटीला रक्कम मिळत नाही.
विमान प्रवास महागणार
नागरि विमान महानिदेशालय (DGCA) 1 एप्रिलपासून एअर सिक्युरिटी फी (ASF) मध्ये वाढ करणार आहे. ज्यामुळे विमान प्रवास महागणार आहे. देशांतर्गत विमानसेवाचा दर कमीत कमी 5 टक्क्यांनी वाढणार आहे. देशांतर्गत प्रवासासाठी एअरपोर्ट सिक्युरिटी फीच्या नावावर 200 रुपये आणि परदेशी प्रवाशांना 12 डॉलर मोजावे लागतील.
स्टीलच्या वस्तूही महागणार
स्टील बनवणाऱ्या कंपन्या किमती वाढवण्याच्या तयारीत आहेत. जेएसडब्ल्यू स्टील, जेएसपीएल, एम/एनएस आणि टाटा स्टील हॉट रोल्ड क्वायल म्हणजे एचआरसीच्या दरात 4000 रुपये टन इतकी वाढ होण्यची शक्यता आहे. कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ आणि ओडिशामध्ये उत्पादनात झालेल्या घसरणीमुळे स्टीलचे दर वाढणार असल्याची शक्यता आहे. याआधी डिसेंबर 2020 मध्ये स्टीलच्या दरात 2500 रुपये प्रति टन वाढ झाली होती.
Leave a comment