मनसुख हिरेन यांची हत्याच, अनिल देशमुख यांनाही मान्य, फडणवीसांचे 2 आरोप खरे ठरले!

 

‘अब तो ये स्पष्ट है, ये सरकार भ्रष्ट है’, परमबीर सिंगांच्या पत्रावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

 

 

गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप, IPS परमवीर सिंह यांच्या पत्राने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

 

मुंबई –

सचिन वाझे – मनसुख हिरेन प्रकरणात बदली झालेल्या मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आज तब्बल आठ पानी लेटर बाँम्ब फोडत महाराष्ट्राचे ठाकरे – पवार सरकार हादरवून टाकले. गृहमंत्री अनिल देशमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या चौघांना घेरले आहे. अनिल देशमुखांनी सचिन वाझे आणि पीआय पाटील यांना १०० कोटी रूपये गोळा करण्याचे टार्गेट दिल्याचा अतिशय खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी केला. याचीच माहिती आपण उध्दव ठाकरे, शरद पवार, अजित पवार यांच्यासह सगळ्या ज्येष्ठ मंत्र्यांना दिली होती, असा दावाही या पत्रात परमबीर सिंग यांनी केला आहे.

सचिन वाझे प्रकरणापासून अन्य प्रकरणांपर्यंत गृहमंत्री अनिल देशमुखांच्या कृष्णकृत्यांचा पाढा लिहून परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या आठ पानी पत्रात सगळ्यांचा कच्चा चिठ्ठा खोलून टाकला आहे.

या लेटर बाँम्बचा धमाका एवढा मोठा आहे, की त्याच्या कानठळ्या ठाकरे – पवार सरकारला बसल्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात यामुळे अतिप्रचंड खळबळ उडाली असून त्याचे जबरदस्त हादरे ठाकरे – पवार सरकारला बसायला लागले आहेत

या पत्रामध्ये परमबीर सिंहांनी लिहिले आहे की, 'महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी सचिन वाझेंना अनेकदा आपला शासकिय बंगला ज्ञानेश्वरमध्ये बोलावले आणि फंड कलेक्ट करण्याचे आदेश दिले. त्यांनी हे पैसे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नावावर जमा करण्यास सांगितले. या दरम्यान त्यांचे पर्सनल सेक्रेटरी मिस्टर पलांडे देखील उपस्थित राहायचे. गृहमंत्री अनिल देखमुखांनी सचिन वाझेंना दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करण्याचे टार्गेट दिले होते.'

 

काय आहेत पत्रातील मुद्दे?

 

परमबीर सिंग म्हणतात, मार्चच्या मध्यावर वर्षा बंगल्यावर मी तुम्हाला भेटण्यासाठी आलो. तिथं अँटीलियाच्या केसबद्दल पूर्ण माहिती देत होतो. त्यावेळेसच मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट कामाबद्दलही तुमच्या कानावर घातलं. एव्हढंच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार तसच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही देशमुखांच्या चुकीच्या कृतीची माहिती दिली. तिथं उपस्थित असलेल्या इतर मंत्र्यांना खरं तर ही माहिती आधीच होती असं माझ्या लक्षात आलं.

सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला १०० कोटी रुपये जमा करायला सांगितलं. फेब्रुवारीच्या मध्यावर वाझेंना शासकीय निवासस्थानावर बोलवून गृहमंत्री देशमुखांनी ही सूचना केली. त्यावेळेस देशमुखांचे पर्सनल सेक्रेटरी पलांडे हेही हजर होते. एक दोन घरातले स्टाफ मेंबरही हजर होते. एवढच नाही तर शंभर कोटी रुपये गोळा करण्यासाठी काय करायचं हेही देशमुखांनी सांगितलं. त्यात देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत १७५० बार आणि रेस्टॉरंट आहेत, आणि त्यातल्या प्रत्येकाकडून दोन ते तीन लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला चाळीस ते पन्नास कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर सोर्सेकडून जमा करता येईल.

त्यानंतर वाझे हे त्याच दिवशी माझ्या ऑफिसला आले. आणि मला देशमुखांनी केलेल्या मागणीबद्दल सांगितलं. मला त्याचा धक्का बसला. खरं तर मी ही परिस्थिती कशी हाताळायची याचा विचार करत होतो.

काही दिवंसापूर्वी सोशल सेवा विभागाचे एसीपी संजय पाटील यांना अनिल देशमुख यांनी त्यांच्या मुंबईतील शासकीय निवास्थानी बोलवून हुक्का पार्लर विषयी चर्चा केली. त्याबैठकीला इतर अधिकारी आणि अनिल देशमुख यांचे पीए पलांदे उपस्थित होते. दोन दिवसांनंतर पाटील आणि डीसीपी भुजबळ यांना अनिल देशमुख यांच्या निवास्थानी बैठकीसाठी बोलवण्यात आले. पाटील आणि भुजबळ यांना अनिल देशमुख यांच्या घराबाहेर थांबवण्यात आलं. त्यावे्ळी पलांदे आत होते. पलांदे यांनी अनिल देशमुख यांच्या केबिनमधून बाहेर आल्यानंतर मुंबईतील ४०-५० कोटी रुपये १७५० बार, हॉटेलमधून जमा होतील, असं पलांदे म्हणाले. संजय पाटील यांनी मला ती माहिती दिली, असं परमबीर सिंग यांनी पत्रात म्हटलं आहे.

देशमुख यांचा भ्रष्ट कारभार पोलीस दलातील अनेक अधिकाऱ्यांच्या नजेत आला होता. परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. ११ व्या मुद्द्यात त्यांनी अनेक गंभीर बाबी स्पष्ट केल्या आहे. देशमुख हे पोलिस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात देऊन देशमुख हे पोलिस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा कऱण्यासाठी टार्गेट द्यायचे. त्या टार्गेटनुससार ते पोलिस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते.

 

मनसुख हिरेन यांची हत्याच, अनिल देशमुख यांनाही मान्य, फडणवीसांचे 2 आरोप खरे ठरले!

मनसुख हिरेन मृत्यू आणि मुकेश अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकं प्रकरणामुळे ठाकरे सरकारला अक्षरश: सुरुंग लागला आहे. माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत, थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. अनिल देशमुख यांनी निलंबित एपीआय सचिन वाझे यांना 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक दावा, परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. मात्र परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांनीही पलटवार केला. 

मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाझे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना आणि त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त श्री परमबिर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत असताना, परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाईपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे, असं ट्विट अनिल देशमुख यांनी केलं.

 

भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

 

शंभर कोटी कसे जमा करायचे हे देखील सांगितले

'घरातील एक दोन स्टाफ मेंबर देखील यावेळी होते. शंभर कोटी जमा करण्यासाठी काय करायचे याविषयीही देशमुखांनी सांगितले होते. यामध्ये देशमुख वाझे यांना म्हणाले होते की, 'मुंबईत 1750 बार आणि रेस्तरॉ आहेत, त्यातल्या प्रत्येकाकडून दोन ते तीन लाख रुपये कलेक्ट केले तरी देखील महिन्याला चाळीस ते पन्नास कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर सोर्सेकडून जमा केली जाऊ शकते.' असेही परमबीर सिंह यांनी पत्रामध्ये नमूद केले आहे.

देशमुखांचा भ्रष्ट कारभार अनेकांच्या नजरेत

परमबीर सिंहांनी पत्रामध्ये पुढे लिहिले आहे की, 'गृहमंत्री अनिल देशमुखांचा भ्रष्ट कारभार पोलिस दलातील अनेक अधिकाऱ्यांच्या नजेत आलेला होता. देशमुख हे पोलिस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवत असत. पोलिसांना ते सातत सूचना देत असायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारामध्ये ठेवून देशमुख हे पोलिस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे जमा करण्यासाठी टार्गेट देत होते. त्या टार्गेटनुससार ते पोलिस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश देत होते. पैसे गोळा करण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांचा उपयोग केला जात होता.' असा गंभीर आरोप परमबीर सिंहांनी केला आहे.

शरद पवारांनाही दिली होती माहिती

पुढे परमबीर यांनी लिहिले, 'मी या प्रकरणाविषयी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारांनाही सांगितले आहे. माझ्यासोबत जे घडले ते चुकीचे घडले, याविषयी मी शरद पवारांना देखील माहिती दिली आहे.'

परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र

परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र

 

या आरोपांवर काय म्हणाले गृहमंत्री ?

'मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाजे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त श्री परमबिर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत असताना परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे.' असे म्हणत गृहमंत्री अनिल देखमुखांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

उल्लेखनीय बाब म्हणजे गृहमंत्र्यांनी सोशल मीडियावर मनसुख हिरेन प्रकरणाला हत्या प्रकरण असे म्हटले आहे. तपास संस्थेने अद्याप असा निष्कर्श काढला नाही.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.