माजी मंत्री पंकजा मुंडेंची घोषणा
बीड | वार्ताहर
जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रक्रियेतून ऐनवेळी भाजपने माघार घेतेली आहे.माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी याबाबत भाजप निवडणूकीवर बहिष्कार घालत असल्याचे स्पष्ट केले. भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
डिसीसी बँक निवडणुकीत सेवा संस्था मतदार संघातील ११ जागांवर उमेदवार ठेवण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना अगदी सर्वोच्च न्यायालयात देखील यश न आल्याने आता उर्वरित ८ जागांसाठिच्या मतदानावरच बहिष्कार घालण्याची भूमिका भाजपने घेतली आहे. निवडणूकित जे काही प्रकार घडले ते जिल्हयाने पाहिले आहे. आम्ही लोकशाही प्रक्रिया म्हणून या निवडणूकिकडे पाहत होतो. आम्ही ५ वर्षात बँकेत शेतकऱ्यांचे हित पाहिले.पण निवडणुकीत सत्तेचा गैरवापर होतोय. सहकार मंत्र्यांवर दबाव आणून अन्याय होतोय.आमची ताकत जास्त असल्याने प्रशासक आणण्याची तयारी सुरु केलीय असे पंकजा मुंडे म्हणाल्या. संचालक बोर्ड बनणारच नाही तर निवडणूक कशाला असे म्हणत निवडणूकिवर बहिष्काराची घोषणा मुंडे यांनी केली.यावेळी राजेंद्र मस्के, भिमसेन धोंडे, रमेश आडसकर , अक्षय मुंदडा यांच्यासह भाजप गटातील उमेदवारांची उपस्थिती होती.
Leave a comment