बीड । वार्ताहर

सौताडा या एकदम छोट्या गावातील सामान्य कुटुंबात जन्म घेतलेले व स्वपरिश्रमाणे व मेहनतीने डॉक्टर झालेले डॉ.पांडुरंग सानप हे मागील 22 वर्षांपासून जामखेड येथर रुग्णसेवा करत आहेत व असंख्य गरजू रुग्णांना प्रत्येक परीने मदत करण्यामुळे सर्वत्र त्यांची ख्याती आहे.
धकाधकीच्या जीवनामुळे फिटनेसकडे लक्ष न देता आल्यामुळे वजन वाढू लागले, त्या साठी त्यांनी चालण्यास सुरुवात केली, त्यानंतर चालण्याबरोबर धावण्यास सुरुवात केली. रोजच धावण्याची सवय लागली होती व त्यातच पुणे मॅरेथॉन मध्ये जाण्याची इच्छा झाली आणि ती दहा किलोमीटर ची स्पर्धा सहज पूर्ण केली, त्यातून धावण्याची आवड निर्माण झाली व आत्मविश्वास पण वाढला. त्या नंतर डॉ सानप यांनी वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेण्याचा विडाच

 

उचलला. हळूहळू धावण्याचे अंतर वाढू लागले.डॉ. सानप यांनी 21 किलोमीटर, 42 किलोमीटर अशा सलग तीन मुंबई मॅरेथॉन मध्ये यशस्वी सहभाग नोंदवला. त्याच बरोबर डॉक्टरांनी लोणावळा 50 किलोमीटर रण, मुळशी 60 किलोमीटर रण, गोवा आयर्न मॅन 70.3 किलोमीटर अशा अनेक स्पर्धा पूर्ण केल्या.हे सर्व करत असताना सायकल वर गड किल्ले सर करण्याची कल्पना डॉक्टरांच्या मनात आली व त्यांनी लगेच या मोहिमेला सुरुवात पण केली. रायगड, प्रतापगड, शिवनेरी किल्ला इत्यादी गडावर सायकल वरून पोहचून त्यांनी त्यांची सायकलिंग ची इच्छा पूर्ण केली, आता त्यांच्या सायकल च्या प्रवासाचे अंतर दिवसेंदिवस वाढतच होते.
डॉ सानप यांच्या मनात प्रदूषण मुक्त भारत व इंधन बचाओ चा नारा देण्यासाठी के2के म्हणजे कश्मीर ते कन्याकुमारी असा प्रवास करण्याची संकल्पना आली. तसे हे अंतर जवळपास 4000 किलोमीटर. पण मी आणि माझा एक मित्र आम्ही दोघांनी काही दिवसांपूर्वी भारताची दोन्ही टोके सायकल करून पार करण्याचे ठरवले. रोज अंदाजे 200 किलोमीटर सायकलिंग करण्याचे ध्येय आहे.  काही अडचणी न आल्यास अंदाजे 17 ते 20  दिवसात ही मोहीम पूर्ण होईल. माझ्या या मोहिमेस घरच्यांचा फार मोठा पाठिंबा आहे व पालकांचे आशिर्वाद बरोबर आहेत, त्याशिवाय मी हे करूच शकत नाही. हे अंतर पार करण्यासाठी आम्ही दहा राज्यातून प्रवास करणार आहोत. तसेच श्रीनगर, जम्मू, पठाणकोट,अमृतसर, सोनिपत, पानिपत,दिल्ली या मार्गे प्रवास करत आम्ही राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यातून आपल्या महाराष्ट्रातील  धुळे, औरंगाबाद,बीड, सोलापूर पार करून कर्नाटक मधील विजापूर, बेंगळुरू मार्गे कन्याकुमारी येथे पोहोचणार आहोत असे डॉ.पांडुरंग सानप यांनी सांगीतले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.