व्यापारी महासंघ न प च्या विरोधात प्रथमच रस्त्यावर

 

माजलगाव । उमेश जेथलिया

     कधी नव्हे ते माजलगावच्या दळभद्री नगराध्यक्ष मुळे आज माजलगावच्या व्यापाऱ्यांना प्रथमच रस्त्यावर उतरून घाण पाण्यात ठिय्या देऊन आंदोलन करावे लागले.माजलगाव चे आ प्रकाश सोळंके यांनी भाजप-सेना-आघाडी नगरसेवक यांचा वापर करून माजलगाव नगराध्यक्ष सहाल चाऊस यांना पायउतार केले.आता माजलगावकराना राहून राहून सहाल चाऊस यांची आठवण येत असून आ सोळंके ना शहरातून लीड देण्याची काय अवदसा सुचली याचा पशताप होत आहे.

 

आ सोळंके नी आपल्या सूडाच्या राजकारणापायी चाऊस यांच्यावर सूड उगवून आपल्या मर्जीतील शेख मंजूर यांना नगराध्यक्ष करून 6 महिन्यात माजलगाव चे रुपडे पालटून टाकण्याचे आश्वसन दिले.आणि काय आश्चर्य ते खरे पण ठरले....! आता फिल्टर पाण्या ऐवजी गढूळ पाणी येत आहे.स्ट्रीट लाईट आठ दिवसात एक दिवस तरी नक्की लागतात.चाऊस यांच्या काळात पाणी 3 दिवसाला यायचे आता त्याचा काहीच नेम नाही कधी पाच दिवसाला,कधी 3 दिवसाला,कधी सकाळी तर कधी दुपारी येऊ लागले आहे.घाणीचे विचाराल तर नगराध्यक्ष झोपेत असे पर्यंत माजलगावची साफसफाई चालू असते.गटारीतले पाणी एवढे शुद्ध दिसत आहे की गटार जणू रोज पहाट साफ होत आहे.एकूण आ सोळंके नी शेख मंजूर यांच्या मार्फत माजलगावच्या लोकांना 5 वर्षे सत्ता दिल्यास आम्ही तुमचे काय हाल करू याचे ट्रेलर शेख मंजूर मार्फत दाखवून दिले आहे.

 

मोंढ्यात दुकानात घाण पाणी

 

 शहरातील जुन्या मोंढ्याच्या प्रवेशद्वार वर रस्त्यावर भला मोठा 15-20फूट लांब खड्डा झाला असून या खड्यात न प ची पाईपलाईन लिकेज होऊन जमलेले घाण पाणी दुकानात जात आहे.रस्त्यावर एखादे वाहन गेले की सगळे पाणी ग्राहकाच्या कपड्यावर उडून जात आहे.नगराध्यक्षच्या आशीर्वादाने हे सर्व घडत आहे.या साठी आज व्यापारी महासंघाच्या अध्यक्षावर खड्यात बसायची वेळ आली.या आंदोलनात अध्यक्ष सुरेंद्र रेदासनी,सचिब  भांडेकर ,विपीन नावदंर,गणेश लोहिया,वैजनाथ घायतीडक, सुहास हुलजुते,खुरपे आदी व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला

 

 

नगराध्यक्षचे तोंड ही दिसेना

 

माजलगावचे नगराध्यक्ष एखादया कार्यक्रमात सोडले तर नागरिकांच्या समस्या जाणून घेताना मागील 4 महिन्यात कुठेही दिसले नाहीत.आज चाऊस असते तर व्यापाऱ्याच्या आंदोलन स्थळी सर्वात आधी पोहचले असते.सहाल चाऊस हे फटकळ स्वभावाचे होते पण कसलेही काम 10 मिनिटात मार्गी लावत प्रत्येक फोन उचलत असत.रोज पहाटे 5 ते 8 आंबेडकर चौकात खुर्ची टाकून लोकांच्या समस्या जाणून घेत व साफसफाई करून घेत होते.शेख मंजूर हे फोन ही उचलत नाही आणि लोकांना दिलेला शब्द- वेळ ही पाळत नसल्याचा अनुभव येत आहे चाऊस सारखे काम ते केव्हा करणार म्हणून राहून राहून चाऊस यांची आठवण लोकांना येत आहे.

 

रात्रीतून रस्ते;नगरसेवक अंधारात..!

 

   शहरात बी एन्ड सी ला वर्ग केलेल्या 5 कोटी रु च्या 47 रस्त्याच्या कामाचे उदघाटन नगराध्यक्ष मंजूर यांनी मोठया थाटात केले.मात्र रस्त्याचे काम रात्री 12 ते पहाटे 5 यावेळात अंधारात उरकून घेण्याचा सपाटा लावला आहे. न बेड कॉक्रीट न सोलिंग, वॉर्डाचा नगरसेवकाला सुद्धा आपल्या वॉर्डात काम चालू असल्याचे माहीत केले जात नाही.असा भ्रष्टाचाररुपी नगराध्यक्ष देऊन आ सोळंके नी माजलगावचा कायापालट सुरू केला आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.