गुरुकुलच्या स्वानंदचे अबॉकस स्पर्धेत अभूतपूर्व यश
स्वानंद देशमुखचा गुरुकुलमध्ये सत्कार
बीड । वार्ताहर
बीड येथील गुरुकुल इंग्लीश स्कूलचा इयत्ता सातवीतील विद्यार्थी स्वानंद संजय देशमुख याने अबॉकस स्पर्धेत अभूतपूर्व यश मिळवत भारतातून प्रथम येण्याचा मान पटकावला. शाळेसाठी ही अभिमानास्पद बाब असून संस्थेच्या वतीने त्याचा नुकताच सत्कार करण्यात आला.
अबॉकस ब्रेन टेलेंट सर्च चम्पियनशिप ऑनलाईन स्पर्धा दिनांक 14 फेब्रुवारी रोजी झाली. सिंगापूर, अमेरिका, नेपाळ, श्रीलंका, ईराण, डेन्मार्क, सौदी अरेबिया, यूके आदी सोळा देशातील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. तर भारतातील केरळ, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, ओरिसा आदी राज्यातील हजारो विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला. आंतरराष्ट्रीय गणितीय क्षेत्रातील या परीक्षेला अनन्यसाधारण महत्व असते. स्वानंद देशमुख याने केवळ चार मिनटात हि स्पर्धा पूर्ण करून पैकीच्या पैकी गुण मिळवून भारतातून प्रथम येण्याचा मान पटकावला. या अभूतपूर्व यशाबद्दल संस्थेच्या वतीने स्वानंदचा व त्याच्या आई वडिलांचा सत्कार संस्थेचे कार्यकारी संचालक अखिलेश ढाकणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आबँकस प्रशिक्षक अशोक घोडके सर, मनोज सर्वज्ञ, उपप्राचार्य शेख सायरा, संजय देशमुख , पुष्पाताई देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती .या यशाबद्दल संस्थेचे सचिव डॉ. राजेंद्र ढाकणे , डॉ. विनीता ढाकणे, प्राचार्य तकीक सर यांनी अभिनंदन केले आहे
Leave a comment