नवी दिल्ली -
कोरोना महामारीनंतर महागाई मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यात तिसऱ्यांदा सिलेंडरचे दर वाढले आहेत. त्यामुळे आता गृहिणींचं महिन्याचं बजेट कोलमडणार आहे. IOCने फेब्रुवारी महिन्यात 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरचे दर वाढवले आहेत. याआधी 4 फेब्रुवारी आणि त्यानंतर 14 फेब्रुवारी रोजी सिलेंडरचे दर वाढले होते. एकाच महिन्यात तिसऱ्यांदा सिलेंडरचे दर वाढल्याने नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.
दरम्यान, डिसेंबर महिन्यात सिलेंडच्या दरात दोन वेळा वाढ झाली होती. 1 डिसेंबर रोजी सिलेंडर 594 रूपयांवरून 644 रूपयांवर पोहोचला. त्यानंतर 15 डिसेंबर रोजी घरगुती सिलेंडरसाठी 694 रूपये मोजावे लागत होते. म्हणजे एका महिन्यात सिलेंडरच्या दरात 100 रूपयांची वाढ झाली. त्यानंतर जानेवारी महिन्यात सिलेंडरच्या दरात कोणत्याही प्रकारचा वाढ झाली नाही.
मात्र फेब्रुवारी महिन्यात 4 तारखेला सिलेंडरच्या दरात 25 रूपयांची वाढ करण्यात आली. त्यामुळे 4 फेब्रुवारीला सिलेंडरसाठी तब्बल 719 रूपये मोजावे लागत होते. त्यानंतर सिलेंडरच्या दरात 50 रूपयांनी वाढ करण्यात आली. सिलेंडरच्या दरात 50 रूपयांनी वाढ झाल्यानंतर 769 रूपये सिलेंडरसाठी मोजावे लागत होते. आता मात्र सिलेंडरसाठी 794 रूपये मोजावे लागणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात सिलेंडरचे दर 100 रूपयांनी वाढवण्यात आले. एलपीजीच्या किंमती सा्तत्याने वाढत असल्यामुळे भारतातील पेट्रोलचे दर आतापर्यंतच्या उच्चांकाला जात आहेत.
एकीकडे देशात सर्वसामान्य जनता पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीमुळे हैराण होत आहे तर दुसरीकडे आता आणखी एक मोठा झटका नागरिकांना बसला आहे. इंधन दरवाढीनंतर आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ करण्यात आली आहे. एलपीजीच्या दरात आता 25 रुपयांनी वाढ करण्यात आली. यामुळे घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्याने सामान्यांचे एकंदरित महिन्याचे बजेट कोलमडले आहे.
आज पासून ( 25 फेब्रुवारी ) हे दर लागू होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्यांदा गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. या अगोदर 4 फेब्रुवारीला विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीत 25 रूपयांनी वाढ झाली होती. सिलेंडरची किंमत 694 रूपयांवरून 719 रुपये करण्यात आली होती.
तत्पूर्वी, डिसेंबरपासून एलपीजी गॅस दर वाढले आहे. यामध्ये 1 डिसेंबरला दर 594 रुपयांवरून 644 रुपये प्रति सिलेंडर झाले होते त्यानंतर 1 जानेवारी महिन्यात दर 644 रुपयांवरून 694 रुपये प्रति सिलेंडर झाले. तर फेब्रुवारी महिन्यात तीनदा एलपीजी गॅस दर वाढलेले दिसून आले. 4 फेब्रुवारी रोजी दर 694 रुपयांवरून 719 रुपये प्रति सिलेंडर झाले 15 फेब्रुवारीला दर 719 रुपयांवरून 769 रुपये प्रति सिलेंडर झाले. 25 फेब्रुवारी रोजी दर 769 रुपयांवरून 794 रुपये प्रति सिलेंडर झाले.
प्रमुख शहरांतील विना अनुदानित १४.२ किलोच्या सिलिंडरच्या किंमती
-
मुंबई - ७९४ रूपये
-
-
दिल्ली - ७९४ रूपये
-
-
कोलकाता - ८२२ रूपये
-
-
लखनौ - ८३२ रूपये
-
-
आग्रा - ८०७ रूपये
-
-
जयपूर - ८०५ रूपये
-
-
पाटणा - ८८४ रूपये
-
-
इंदूर - ८२२ रूपये
-
-
पुणे - ७९८ रूपये
-
-
अहमदाबाद - ८०१ रूपये
Leave a comment