आ.लक्ष्मण पवारांची मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी
गेवराई | वार्ताहर
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग 52 बाह्यवळण रस्त्यापासून गेवराई शहरातून जात असलेला रस्ता अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. या शहरअंतर्गत रस्त्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आ लक्ष्मण पवार यांनी केंद्रीय रस्ते वाहातुक मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे प्रत्येक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे केली.
दिलेल्या निवेदनात ते म्हणाले की, गेवराई मतदारसंघातील अनेक गावांना जोड रस्त्यासाठी पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच मतदारसंघातील गोपतपिपंळगाव येथील गोदावरी नदीवरील पुलासाठी वाढीव निधी उपलब्ध करून द्यावी तसेच बागपिपंळगाव ते उमापूर शेवगाव रस्त्यांला लवकरात लवकर निधी उपलब्ध करून प्रत्येक्ष कामांला सुरूवात करावी. खेलो इंडिया योजनेंतर्गत गेवराई शहरातील क्रिडागंणासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती आ.पवार यांनी गडकरी यांच्याकडे केली आहे. यावेळी नांदेड जिल्ह्यातील नायगावचे आमदार राजेश पवार यांची उपस्थिती होती.
Leave a comment