मुंबई | प्रतिनिधी

बलात्काराच्या आरोपांमुळे गेल्या काही दिवसांपासून वादात अडकलेले राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेने मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतल्याचं वृत्त आहे.

कौटुंबिक कारणास्तव तक्रार मागे घेत असल्याचं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. तशाप्रकारे पोलिसांना तिने काल(दि.२१) लेखी निवेदन दिलं  प्रकरणाला राजकीय वळण लागल्यामुळे तक्रार मागे घेत असल्याचं रेणू शर्माने म्हटलंय.

 

धनंजय मुंडे यांच्याविरोधात रेणू शर्मा या तरुणीने इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार मुंबईतल्या ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. बॉलीवूडमध्ये चांगली संधी मिळवून देण्याच्या नावाखाली आपल्यावर 2006 पासून अत्याचार सुरु होते असं तिने तक्रारीत म्हटलंय. धनंजय मुंडे यांनी  यासंदर्भात खुलासा करत सर्व आरोप फेटाळले होते. हे आरोप खोटे असून बदनामी करणारे आणि आपल्याला ब्लॅकमेल करण्यासाठी असल्याचा दावा मुंडे यांनी केला होता.

धनंजय मुंडे यांनी माझ्याशी इच्छेविरुद्ध संबंध ठेवले. तुला बॉलिवूडमध्ये मोठ्या निर्मात्यांशी भेट घालून देईन आणि काम मिळवून देईन असे आश्वासन दिले असा आरोप रेणूने केला होता. या आरोपानंतर राजकीय क्षेत्रात मोठा राजकीय भूकंप झाला. विरोधकांना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

 

रेणू शर्मा हिने दिलेल्या तक्रारीनुसार ती 1997 साली आपल्या इंदौरच्या घरी धनंजय मुंडे यांना पहिल्यांदा भेटली होती. 1998 साली धनंजय मुंडे यांनी बहीण करुणा हिच्याशी लग्न केल्याचे रेणूचं म्हणणे आहे. लग्नाच्या बहाण्याने आपल्या बहिणीशी शारीरिक संबध ठेवल्याचा आरोप तिने केलाय. धनंजय मुंडे यांनी 2012 मध्ये एनसीपीमध्ये प्रवेश केला होता.

या तरूणीने पोलिसांनी तक्रारीची दखल न घेतल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी दखल न घेतल्याने तिने याबाबत मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ट्वीट करत तिने ही माहिती दिली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्वीट करत मदतीची साद घातली होती.

 

रेणू शर्माने लेखी प्रतिज्ञापत्र देऊन तक्रार घेतली मागे

 

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंना मोठा दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार आता पीडित महिला रेणू शर्माने मागे घेतली आहे.पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणू शर्मा हिने आपली तक्रार मागे घेतली आहे. पण पुन्हा ती तक्रार मागे घेण्यावरुन मागे फिरु नये म्हणजेच मी तक्रार मागे घेतली नाही असा दावा करू नये या करता पोलिसांनी तिला आपले म्हणणे प्रतिज्ञापत्राद्वारे देण्यास पोलिसांनी सांगितले होते. त्यानुसार, रेणू शर्मा हिने आपली तक्रार मागे घेतली असे ते प्रतिज्ञापत्र तिने मुंबई पोलिसांना दिले आहे.  एका वरीष्ठ अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर या माहितीला दुजोरा दिला.

“मी केलेली तक्रार काही कारणास्तव मी मागे घेत आहे” असं प्रतिज्ञपत्र रेणू शर्मा हिने पोलिसांना दिले आहे. तर या प्रकरणातील रेणू शर्माचे वकील यांनी 3 दिवसांपूर्वीच काही खाजगी कारण सांगत रेणू शर्माची केस त्यांनी सोडली होती. त्यानंतर आता रेणू शर्मानेच तक्रार मागे घेतली त्यामुळे धनंजय मुंडेंना मोठा दिलासा मिळाला आहे.  15 जानेवारीला रेणू शर्माने ट्विट करुन आपण तक्रारार मागे घेत असल्याचे सागंतिले होते.

 

कोण आहे रेणू शर्मा?

 

महाराष्ट्र सरकारमधील धनंजय मुंडे या बड्या नेत्यावर आरोप करणाऱ्या रेणू अशोक शर्मा या बॉलिवूड गायिका आहेत. रेणू शर्मा यांनी दावा केला आहे की, 1997 मध्ये त्यांची आणि धनंजय मुंडेंची भेट झाली. तेव्हा त्या 16-17 वर्षांच्या होत्या. मध्यप्रदेशात त्यांच्या बहिणीच्या घरी त्यांची भेट झाली होती. 2006 मध्ये त्यांची बहिण इंदुरमध्ये असताना मुंडे यांनी इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप रेणू यांनी केला होता. बड्या निर्मात्याला भेटवण्याच्या आणि बॉलिवूडमध्ये लाँच करण्याच्या नावाखाली त्यांनी वारंवार शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप रेणू यांनी केला होता.

 

खोटे आरोप करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करा : चित्रा वाघ

 

धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी होती. परंतु आता संबंधित महिलेने त्यांच्याविरोधातील तक्रार मागे घेतल्यानंतर भाजपने खोटे आरोप करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अशाप्रकारामुळे ज्या महिला खरंच पीडित महिला आहेत त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलतो. सरकारी यंत्रणाचा बराच वेळ या प्रकरणात गेला. अशा प्रकारच्या आरोपांमुळे एखाद्याचं वैयक्तिक आयुष्यासह राजकीय जीनवही उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे खोटे आरोप करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.