चर्चेअंती मुंडे यांचा राजीनामा घाईघाईनं न घेण्याचा निर्णय झाला, असे सूत्रांकडून समजते.
पोलीस चौकशी पूर्ण झाल्यानंतरच पक्षाच्या पातळीवर पुढील निर्णय घेण्याबाबत बैठकीत एकमत झाल्याचं समजतं
मुंबई | प्रतिनिधी
बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेले राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना पक्षाकडून दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांचा तूर्तास राजीनामा घेतला जाणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला
आहे. बलात्काराचा आरोपांमुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत चालला होता. विरोधी पक्षाच्या काही नेत्यांनी त्यांच्या राजीनाम्या मागणी केली होती. परंतु मुंडे यांना पक्षाकडून तूर्तात तरी दिलासा मिळाला आहे.
रेणू शर्मा नावाच्या महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले. परंतु ही महिलाच ब्लॅकमेलिंग करत असल्याची बाब समोर आली. पक्षप्रमुख शरद पवार यांनी याबाबत माहिती घेतली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यामुळे
तूर्तास तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत निश्चित झाल्याचं कळतं.
मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर पक्षीय पातळीवर निर्णय घेण्यासाठी काल रात्री उशिरा राष्ट्रवादीने मुंबईत बैठक घेतली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत रेणू शर्मा या महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर जे आरोप केलेत ते गंभीर
असल्याचीही चर्चा झाली.
मात्र, त्याच बरोबर ही महिला ब्लॅकमेलिंग करत असल्याची बाब समोर आली असल्याची चर्चा या बैठकीत झाली. त्यामुळे तूर्तास धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, असा निर्णय पक्षाने घेतला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार
सुप्रिया सुळे, पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. या बैठकीत धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांबाबत सविस्तर चर्चा
झाल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका मांडली आणि पक्षाचा पूर्णपणे धनंजय मुंडे यांना पाठिंबा असल्याचे दिसतंय.
मुख्यमंत्र्यांना नारळ देऊन शरद पवारांनी सत्तेची सूत्रे हाती घ्यावी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांनंतर पक्ष सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहे. आरोपांनंतर धनंजय मुंडे यांनी शरद पवारांची भेट घेऊन प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. शरद पवारांनीही तक्रार गंभीर असून पक्षातील नेत्यांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेतला जाईल असं म्हटलं आहे. यादरम्यान शरद पवारांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतल्याच्या वृत्तावर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.
अतुल भातळखकर यांनी ट्विट करत शरद पवारांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. “पोलीस अधिकाऱ्यांनी शरद पवारांसोबत चर्चा करायला ते राज्याचे गृहमंत्री आहेत की मुख्यमंत्री? राज्यात कोणतेही अधिकार पद नसलेल्या पवारांशी चर्चा करणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी मी कॅबिनेट सचिवांकडे करणार आहे,” अस अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.
“पाठीमागून सूत्र हलवण्यापेक्षा घरी बसलेल्या मुख्यमंत्र्यांना नारळ देऊन शरद पवारांनी सत्तेची सूत्रे हाती घ्यावी,” असा उपहासात्मक सल्लाही अतुल भातखळकर यांनी दिला आहे.
जितके गुन्हेगार एका जेलमध्ये नसतील
तितके राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात आहेत
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर होणाऱ्या या आरोपामुळे माजी खासदार निलेश राणे यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. निलेश राणेंनी ट्विट करत म्हटलंय की, नरेंद्र मोदी यांच्यामुळे डिजिटल पेमेंट करायची लोकांना सवय झाली आणि डिजिटल पेमेंटमुळे नवाब मलिक यांचा जावई ड्रग्सच्या प्रकरणात पकडला गेला. राष्ट्रवादीत चाललंय काय? इतके क्रिमिनल मिळून एका जेलमध्ये नसतील तितके एका पक्षात आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे.
तसेच विश्वास नांगरे पाटील आणि शरद पवार भेटीवरही निलेश राणेंनी भाष्य केलं आहे. मुंबईचे सहपोलीस आयुक्त एका बलात्काराच्या प्रकरणासाठी एका पक्षाच्या नेत्याला कसे भेटू शकतात आणि ते पण त्यांच्या घरी? असा सवाल उपस्थित करत हे प्रकरण झाकायचा अजेंडा दिसतोय, यामुळे पोलिसांवर लोकांचा विश्वास उडेल, सामान्य लोकांसाठी ही सुविधा आहे का? हे पण आयुक्तांनी सांगावं अशी टीका निलेश राणेंनी केली आहे.
Leave a comment