प्रशासनाचे 10 दिवसापासून ’वेट वॉच’
माजलगाव । वार्ताहर
मागील महिनाभरापासून माजलगाव तालुक्यात बिबट्याची दहशत असून अनेकांनी बिबट्या पाहिले असल्याचे सांगून ही प्रशासनाचे वेट वॉच एखाद्याचा बळी घेतल्यावरच थांबणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मागील 8 दिवसा पासून वाघोरा, मंगरूळ, केसापुरी,मंजरत च्या अनेक शेतात तसेच नवा मोंढा परिसरात अनेकांनी बिबट्या पाहिल्याचे प्रशासनास कळवले आहे.मात्र प्रशासन वन विभागास कळवले आहे एवढे उत्तर देण्यापलीकडे काहीच करत नाही.बिबट्या पहिला असल्याचे अनेकजण सांगत आहेत मात्र कोठेच जीवितहानी झाली नाही. शुक्रवारी शहरास खेटून असलेल्या मनुर शिवारात सकाळी 11 च्या सुमारास शेतात काम करणार्या शेतमजूरांना अचानक बिबट्याचे दर्शन झाले त्यामुळे या लोकांनी गावात धूम ठोकली. या घटनेने सावध झालेले प्रशासन सदरील प्राणी बिबट्याच आहे का याचा आता शोध घेत आहे.मागील एक महिन्यांपूर्वी सावरगाव शिवारात शेतकर्यांना बिबट्या सदृश प्राण्याचे दर्शन झाले होते त्यावेळेपासून लोक दहशतीत होते,तेथे वनविभागाने तडस असल्याचे सांगितले होते. त्यानंतर दि.27 डिसेंबर रोजी शहरापासुन 5 कि.मी.अंतरावर फुलेपिंपळगाव शिवारात असलेल्या नवीन मोंढा व टी.एम.सी.केंद्र असुन या ठिकाणी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते कल्याण गुंजकर आपल्या मित्रासह बीडहुन माजलगावकडे येत असतांना त्यांना टी.एम.सी.केंद्राजवळ बिबट्या जात असल्याचे दिसून आले. त्यांनी आपली गाडी थांबवुन त्याच्याकडे काहीवेळ पाहिले असता त्यांना बिबट्या जात असल्याचे दिसून आले होते.आता शुक्रवारी भरदिवसा सकाळी 11 च्या सुमारास बिबट्या दिसल्याने मनुर परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत प्रशासनाने वनविभागाच्या अधिकारी यांना पाचारण केले असून पायाचे ठसे अस्पष्ट दिसत असल्याने अद्याप तो प्राणी कोणता याचा अंदाज लागलेला नाही.
Leave a comment