देवेंद्र फडणवीस काय सुप्रीम कोर्ट आहे काय?

ओबीसी जनमोर्चाच्या बैठकीत वाद

 

जालना / वार्ताहर

 मंत्रीपद गेलं तरी चालेल पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू देणार नसल्याचं मोठं वक्तव्य काँग्रेस नेते, मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. विजय वडेट्टीवार पत्रकारांशी बोलत होते. मराठा आरक्षणामुळे ओबीसी समाजाला धक्का लागेल, अशी भीती काही ओबीसी नेत्यांना वाटत आहे. आम्ही पूर्ण ताकदीनिशी मराठा समाजाबरोबर आहोत. मात्र आम्हाला ओबीसी समाजामधून आरक्षण द्या म्हणणे पूर्ण चुकीचं आहे. जर असा प्रयत्न झालाच तर मंत्री पद गेलं तरी चालेल पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नसल्याचं विजय वडट्टीवार यांनी म्हटलं आहे. 

.         जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख यांच्या निवासस्थानी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी सदिच्छा भेट दिली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते . यावेळी आमदार राजेश राठोड ,बबनराव तायवडे ,बाळासाहेब सानप शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख मेहमूद ,प्रदेश सचिव प्रा. सत्संग मुंढे ,जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस  राम सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंत्री श्री वडेट्टीवार यांच्या  राजेंद्र राख यांनी शाल व पुष्पहार देवुन सत्कार केला.
यावेळी  वडेट्टीवार म्हणाले कि मराठा आरक्षण हा विषय न्यायालयीन प्रक्रियेत आहे. त्यांच्या आरक्षणासंबंधी आमचा विरोध नाही. परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. ही  आमची भूमिका आहे.  ओबीसी समाजाला महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून न्यायहक्क मिळवून देण्यासाठी आपले संपुर्ण  प्रयत्न राहणार आहेत . नागपूर विभागाच्या पदवीधर मतदार संघात भाजपाची विजयाची परंपरा ओबीसी समाज एकजूट झाल्याने आणि तसेच महाविकास आघाडी सरकारच्या कामामुळे मोडीत निघाली आहे. या मतदार संघातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या विजयामुळे भाजपाच्या विचाराविरुद्ध देशामध्ये मोठा संदेश गेला आहे . असे त्यांनी यावेळी सांगितले .

देवेंद्र फडणवीस काय सुप्रीम कोर्ट आहेत काय? असं म्हणत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. भाजपच्या हातात सत्ता द्या मराठा समाजाला आरक्षण मिळेल असं काही भाजप नेते वक्तव्य करत आहेत. मात्र फडणवीस काय सुप्रीम कोर्ट आहे काय? अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. आरक्षणाचा विषय आता राज्य सरकारच्या हातात नाही. हायकोर्टाने निकाल दिल्यानंतर कोण सुप्रीम कोर्टात गेल. त्यावेळी कोण शुक्राचार्यानं बाजू मांडली माहिती नाही. मात्र हे मराठा समाजाचं दुर्देव असून फडणवीस काय सुप्रीम कोर्ट नाही, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

ओबीसी जनमोर्चाच्या बैठकीत वाद, छगन भुजबळांना......

 

छत्रपती लॉन्समध्ये शनिवारी (ता.पाच) ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाची मराठवाडा विभागीय बैठक पार पडली. यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते. या बैठकीचे आयोजन हे बाळासाहेब सानप यांनी केले होते. दरम्यान, या विभागीय बैठकीला बॅनरबाजीपासूनच ग्रहण लागल्याचे दिसून आले. जालना महामार्गावर ठिकठिकाणी लागलेल्या बॅनरवर आयोजक म्हणून नाव असलेले श्री.सानप यांचा ओबीसी नेते म्हणून उल्लेख करण्यात आला. याच वेळी यावर दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे छायाचित्र छापण्यात आले आहे.

 

दरम्यान, कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणारे मंत्री विजय वडेट्टीवार यांचे फक्त छायाचित्र छापण्यात येऊन त्यांचे नाव व पदाचा कुठलाही उल्लेख त्यावर करण्यात आला नव्हता. सोबतच कार्यक्रमाच्या ठिकाणाचाही समजेन असा पत्ता दिला नसल्याने शनिवारी सकाळ पासुनच या कार्यक्रमाची उलट-सुलट चर्चा सुरू होती. यातच कार्यक्रम सुरू असताना बालाजी शिंदे यांचे भाषण सुरू असताना श्री.शिंदे यांनी छगन भुजबळ यांच्या विषयी नकारात्मकता व्यक्त केल्याने समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत त्यांचे भाषण थांबवले.

ओबीसी समाजासाठी छगन भुजबळांचे कार्य मोठे असल्याचे सांगत समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष मनोज घोडके व कार्यकर्त्यांकडून यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. कार्यक्रम स्थळावरील बॅनरवरही छगन भुजबळ यांचे छायाचित्र छापलेले नव्हते. यावरही कार्यक्रमात चांगलीच खडाजंगी झाली. हे सर्व मंत्री वडेट्टीवार यांच्या समोर घडले. शेवटी श्री. वडेट्टीवार यांनी मध्यस्थी करत प्रकरण शमवताना श्री.भुजबळ यांचे समाजाविषयीचे कार्य मोठे असल्याचे सांगत यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, यामुळे संपूर्ण बैठकीत कुजबुज सुरू होती.

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.