आरक्षण अबाधित ठेवा अन्यथा परिणाम भोगा : उदयनराजेंचा इशारा

मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत सरकार कधीच गंभीर नव्हते. त्यामुळे आज त्याचा परिणाम मराठा समाजाला भोगावा लागत आहे. मी सरकारला जाहीर आवाहन करतो. सरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण अबाधित ठेवावं. अन्यथा होणार्‍या  परिणामाला  सामोरे  जावे, अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासंदर्भात तोफ डागली.

यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे की,  मराठा समाज आता एकटा नाही एवढच सांगतो. मी तुमच्या सोबत आहे. या आधी मराठा आरक्षण प्रकरण उच्च न्यायालयात गेले, तरी तिथे आरक्षण टिकवता आले. आज मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने मोठा धक्का बसला आहे. केवळ राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे ही वाईट वेळ मराठा समाजावर आली आहे. महाराष्ट्र सरकार ५० टक्क्यांच्या वर आरक्षण देण्यासाठी कुठलीही विशेष बाब सिद्ध करण्यामध्ये अपयशी ठरले आहे. हे करत असताना राज्य सरकारने कुठलीही खबरदारी घेतली नाही, अशा शब्दात उदयनराजेंनी महाविकास आघाडीवरही टिकास्त्र सोडले.

सरकार कोणत्याही पक्षाचे असो ही सर्वांची जबाबदारी आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मराठा आरक्षणाच्या प्रकरणातील अंतरिम आदेश हे जणू काही अंतिम आदेश आहेत. असाच हा निकाल दिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सर्वोच्च न्यायालयात पूर्ण सुनावणी झाली नसताना न्यायालयासमोर काय डॉक्युमेंट्स आहेत त्याची पूर्ण चर्चा झालेली नसताना इतका मोठा निर्णय हे मराठा समाजावर अत्यंत अन्यायकारक आहे.  त्यामुळे शासनाने अध्यादेश काढून मराठा आरक्षण अबाधित ठेवावं हाच मार्ग शासनासमोर आता आहे, असेही खा. उदयनराजे यांनी म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे समाजाच्या प्रगतीला मोठी खिळ बसली आहे. सरकारने समाजाला विश्वासात घेवून योग्य ती कार्यवाही केली असती, तर मराठा आरक्षण कायम टिकवता आले असते. मी सरकारला एकच सांगू इच्छितो. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या सवलती तसेच नोकरभरतीतले आरक्षण कायम ठेवावे यासाठी सरकारने तातडीने अद्यादेश काढावा. अन्यथा होणार्‍या परिणामाला सामोरे जावे. मराठा समाजाच्या प्रत्येक लढ्यात मी त्यांच्यासोबत आहे. समाजाच्या उन्नतीसाठी आपण प्रयत्नांची शर्थ करु या लढ्यात ते एकटे नाहीत. याची सरकारने जाणीव ठेवावी, असा इशाराही खा. उदयनराजे यांनी दिला आहे.

मराठा आरक्षण । रस्त्यावर उतरावे लागले तरी चालेल - शिवेंद्रराजे भोसले

 

मराठा आरक्षण । रस्त्यावर उतरावे लागले तरी चालेल - शिवेंद्रराजे भोसले

सातारा : मराठा आरक्षण स्थगितीबाबत मराठा समाज म्हणून जी भूमिका घेतली जाईल त्याबाबत आपण समाजाबरोबर राहू आणि वेळ पडली तर पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागले तरी त्यासाठी तयार असल्याची थेट भूमिका साताऱ्याचे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मांडली आहे. 

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबत राज्य शासनाकडून बाजू योग्य पद्धतीने मांडली गेली नाही आणि त्यामुळेच मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याचा आरोप देखील शिवेंद्रराजे भोसले यांनी केला आहे. सर्वोच्य न्यायालयाकडून मराठा समाजाच्या आरक्षणाला जी स्थगिती देण्यात आली याबाबत समाज म्हणून जी भूमिका घेतली जाईल त्याबाबत मी समाजाबरोबर राहणार आणि वेळ पडली तर आंदोलनात सहभागी होईन, असे ते म्हणाले.

'यापुढे समाज जो ठरवेल ती माझी भूमिका'

दरम्यान, संभाजीराजे यांनीही आपली भूमिका मांडली आहे. मी समाजाचा घटक या नात्याने जबाबदारी पूर्वक सांगू इच्छितो की, महाराष्ट्रातील विद्यमान सरकार असो की मागचे सरकार असो. समाजाने टाकलेल्या विश्वासाला गृहीत धरून कुणी दगा फटका करत असेल तर त्यांना त्याची जबर किंमत मोजावी लागेल. यापुढे समाज जो ठरवेल ती माझी भूमिका असेल.

आज मराठा समाजावर अन्याय झाला! आम्ही राज्यघटनेचा आणि न्याय व्यवस्थेचा आदर करतो. मराठा समाजाने आरक्षण मिळवण्यासाठी प्रचंड मोठा त्याग केला आहे. अनेकांनी स्वतःच्या आयुष्याची होळी केली, हजारो लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत, संभाजीराजे यांनी ट्विट करत म्हटले आहे.

 

या राष्ट्राच्या एकेक इंच जमिनीचे रक्षण करण्याकरिता, इथल्या संस्कृतीचे रक्षण करण्याकरिता सर्वात जास्त त्याग करणारा हा समाज आहे. त्या राष्ट्रभक्त समाजाला स्वतंत्र भारतात डावलले जात असल्याची भावना निर्माण होत आहे. राज्यघटनेच्या चौकटीत मराठा समाजालाही समतेची वागणूक मिळावी अपेक्षा आहे. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.