मुंढे यांना भावपूर्ण निरोप; 'तुम्ही परत या' ची एकमुखी मागणी

जे-जे चांगले शिकायला मिळाले, ते शिकलो. काही कटू अनुभव असतीलही; मात्र त्यातूनही बोध घेतला. नव्या ठिकाणी रुजू होण्यासाठी उद्या मुंबईला रवाना होतोय. जेथे कुठे असेल, आपले प्रेम कायम सोबत असेल. या शहरासाठी काही चांगले करण्याचा प्रयत्न केला, याचा अभिमान असेल. नागपूर महानगरपालिकेतील कटू-गोड आठवणींसह मनपाला Good bye. आपण सर्वांनी जी साथ दिली त्याबद्दल Thank you…!

नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली मुंबईत करण्यात आली. तुकाराम मुंढेंना कोरोनाची लागण झाली होती. त्याकाळातच ही बदली करण्यात आली होती. आज ते मुंबईला रवाना झाले. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने नागपूरकरांनी त्यांच्या घराबाहेर गर्दी केली. 

 

नागपूर:

महानगरपालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या, फुलांचा वर्षाव करणाऱ्या व घोषणांचा पाऊस पाडणाऱ्या नागपूरकरांना हात जोडून नमस्कार केला व त्यांचा निरोप घेतला.
शुक्रवारची सकाळ तपस्या या आयुक्त निवासासमोर वेगळीच उजाडली होती. काहीशी खिन्न तर बरीचशी आक्रमक..

नागपुरातील सामान्यजनांच्या पसंतीस खरे उतरलेले आयुक्त तुकाराम मुंढे हे मुंबईस रवाना होणार होते.. त्याकरिता त्यांना निरोप द्यायला गुरुवारपासूनच त्यांच्या द्वारी रीघ लागलेली होती.. कुणी पुष्पगुच्छ आणत होते.. कुणी त्यांचे रेखाचित्र काढून आणत होते.. तर कुणी त्यांना राखी बांधत होते.. तर कुणी काही भेटवस्तूही आणताना दिसत होते..जो तो आपापल्या परीने आपल्या भावना व्यक्त करीत होते..


शुक्रवारी सकाळी ८ वाजल्यापासूनच मुंढे यांच्या निवासस्थानासमोर गर्दी जमू लागली होती. पाहता पाहता ती वाढू लागली. तुकाराम मुंढे परत या अशा घोषणा हवेत निनादू लागल्या.. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीही हजर झाले होते. पोलीस बंदोबस्तही तगडा होता.
शेवटी साडेदहाच्या सुमारास तुकाराम मुंढे बाहेर आले.. उपस्थित नागरिकांना त्यांनी अभिवादन केले व ते गाडीत बसले.. त्यांच्या गाडीवर फुलांचा, घोषणांचा, गुलालाचा वर्षाव करण्यात आला. उपस्थित पोलिसांनी त्यांना अभिवादन केले... त्याचा स्वीकार त्यांनी केला.. आणि ते विमानतळाकडे रवाना झाले.. नागपुरात याआधी कोणत्याही आयुक्तांना अशा प्रकारने नागपूरकरांचे प्रेम मिळाले नसल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती.

मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम मुंढे हे आज त्यांच्या कुटुंबासह मुंबईला निघाले होते. तेव्हा नागपूरकरांनी मोठा फुलांचा वर्षाव केला आणि त्यांच्या गाडीच्या पुढे येऊन गाडी अडवण्याचा प्रयत्नसुद्धा करण्यात आला. नागपूर्वासियांनी महापौर मुर्दाबाद आणि भाजपच्या नेत्यांच्या विरोधात मुर्दाबाद असे नारेसुद्धा लावले, यावेळी पोलिसांची मोठी तारांबळ उडाली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

तुकाराम मुंढे यांचा निरोपाचे शब्द...

तुम्ही मला इतकं प्रेम दिलंत, निरोप देण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने आलात.. मी सगळ््यांना मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही माझ्या मनात कायम रहाल. नागपूरकरांचे प्रेम अविस्मरणीय आहे. मी माझे काम करीत राहीनच. माझ्याकडून जेवढं करता आलं तेवढं १०० टक्के काम मी केलं आहे. हे शहर तुमचं आहे.. त्याला चांगलं बनवण्यात तुमचा वाटा मोलाचा आहे. शहरातील समस्या ओळखा व त्यावर काम करा. संघटित रहा.. जयहिंद..

Thank you Nagpur! म्हणणाऱ्या तुकाराम मुंढेंची फेसबुक पोस्ट व्हायरल
नागपूरकरांनी सात महिन्यांच्या कालखंडात जी साथ दिली आहे त्याबद्दल तुकाराम मुंढे यांनी नागपूरकरांचे धन्यवाद मानत फेसबुक पोस्ट लिहिली आहे.

Goodbye NMC, Thank you Nagpur!

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.