दोन कोटी वीस लाख रुपये शेतकर्यांच्या खात्यात जमा-शाखा व्यवस्थापक शिंदे
तिर्थपुरी । वार्ताहर
समर्थ कर्मवीर अंकुशराव टोपे साखर कारखाना कडून ऊस उत्पादकांना पोळा सणा साठी 2019 व 20 20 यावर्षी कारखान्यांनी गाळप केलेल्या उसा पोटी पोळा सणा साठी शंभर रुपये प्रति टन वाढ देण्यात आली असून तीर्थपुरी समर्थ बँकेत 3 673 ऊस उत्पादक खातेदाराच्या सेविंग खात्यामध्ये दोन कोटी वीस लाख जमा झाल्याची माहिती समर्थ बँकेचे शाखा अधिकारी एनके शिंदे यांनी दिली आहे.
तसेच उत्पादक शेतकर्यांना यापूर्वी पहिला हप्ता 2500 रुपये प्रति टन देण्यात आला असून तसेच ऊस उत्पादक शेतकरी अडचण लक्षात घेऊन पोळा सणासाठी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री नामदार राजेश भैय्या टोपे यांनी सर्व उत्पादक शेतकर्यांना शंभर रुपये प्रति टन जाहीर करून तात्काळ पोळा सणा साठी तीर्थपुरी समर्थ बँकेत 35 गावातील ऊस उत्पादक खातेदारांना दोन कोटी वीस लाख रुपये संबंधित खात्यात जमा केले असून सोमवार रोजी दिनांक 17 ऑगस्टपासून वाटप सुरू केले आहे तसेच ऊस उत्पादक शेतकर्यांनी प्रशासनाचे नियमाचे पालन करून तोंडाला मास्क व सोशल डिस्टंसिंग गर्दी टाळून आपली रक्कम कोणतेही घाई गर्दी न करता रांगेत उभे राहून घेऊन जावी तसेच या शंभर रुपये प्रति टन वाढ राजेश टोपे यांनी दिल्यामुळे शेतकर्याला मोठा दिलासा मिळाला असून ही रक्कम शेतकर्यांना वाटप वेळेवर व सणासाठी व्हावी म्हणून बँकेचे शाखा व्यवस्थापक एन के शिंदे तसेच संतोषराव नागरे,संभाजी खोजे पांढरे दीपक रक्ताटे सोमेश्वर गुळवणे मोहनराव काळे अभिषेक नाटकर अशोक बोबडे महेश उबाळे राजगुरू सह कर्मचारी व परिश्रम घेत आहे.
Leave a comment