दादेगाव जहागीर येथील ग्रामपंचायतचा धक्कादायक प्रकार
पैठण । वार्ताहर
पैठण तालुक्यातील दादेगाव जहागीर येथील ग्रामपंचायतीने चौदाव्या वित्त आयोगातून दोन लक्ष रूपये खर्चून केलेल्या रस्त्याचे महिनाभरात तिनतेरा वाजून तडे गेले असून गावच्या विकास कामात भ्रष्टाचार करून शासनाच्या निधीचा अपहार केला असल्याची तक्रार ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी पैठण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की दादेगाव जहॉगीर येथे चौदाव्या वित्त आयोगातून जुन्या गावात दोन लक्ष रूपये खर्चून सिमेंट कॉक्रीटचा दोन फुट रस्ता अतिशय निकृष्ट व दर्जाहिन बनवल्याने सदरिल रस्त्याला महिनाभरातच तडे जावून तो खचला आहे या कामाची पाहणी अद्यापही बांधकाम विभागातील अधिकारी यांनी केली नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यातच ग्रामसेवक व सरपंच यांच्या एकटा चलोरे या धोरणामुळे इतर ग्रामपंचायत सदस्य व नागरिक वैतागले आहेत. नागरिकांनी सरपंच बाळकृष्ण गाडे यांना विचारणा केली असता आम्हाला कोणालाही विचारायची आवशकता नाही असे उडानटप्पूचे उत्तर दिले जात असल्याचे म्हटले जाते त्यातच इतर विकास कामातही त्यांनी मोठ्या प्रमाणात अपहार केला असून त्यांचे नातेवाईक चुलते, काके, सोयरे यांच्या नावाने देयके उचलली असून विकास कामासाठी आलेल्या शासनाच्या निधीची लुट सुरू आहे. सदरिल कामाचे देयके थांबवून या प्रकरणी उच्चस्तरावरून चौकशी करून दोषीवर तात्काळ कारवाई करावी. नसता आम्ही आपणास कुठलीच पुर्व सुचना न देता आपल्या कार्यालया समोर उपोषणास बसू असे गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे .तर या निवेदनावर उपसरपंच आरेफा इब्राहिम शेख ,मुक्ताबाई घोडके, शिवगंगा देशमुख, अण्णासाहेब खेडकर ,शोभा पवार ,नासेर शेख आदींच्या स्वाक्ष-या आहेत
Leave a comment