बीड/प्रतिनिधी
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारत सरकारचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची केंद्रीय मंत्री मंडळात तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल बीड जिल्हा रिपाइंच्या वतीने शनिवार (दि.5) ऑक्टोबर रोजी बीड शहरात छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे दुपारी 3:30 वाजता, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा भव्य सत्कार सोहळा युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा रिपाइं बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली सपन्न होतो आहे. या ऐतिहासिक भव्य सत्कार सोहळ्यात निळे वादळ उसळणार आहे.
मंत्री रामदास आठवले यांची केंद्रीय मंत्रिमंडळात सलग तिसऱ्यांदा सामाजिक न्याय मंत्री म्हणून निवड झाली आहे.या निवडीचा युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पु कागदे यांच्याकडून ऐतिहासिक सत्कार सोहळा आयोजित केला आहे. या सत्कार सोहळ्याची अतिशय जय्यत तयारी बीड शहरात करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने होल्डिंग, कमानी, बॅनर, निळ्या पट्टया व निळ्या ध्वजाचा झंझावात निर्माण करुन निळ्या वादळाचे शक्तिप्रदर्शन रिपाइंच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान मंत्री रामदास आठवले यांचा हा सत्कार सोहळा ऐतिहासिक ठरणार असून त्यासाठी जिल्हाभरातून रिपाइं कार्यकर्ते हजारो गाड्यांचा ताफा घेऊन दाखल होणार आहेत.
बीड शहरात रिपाइंच्या वतीने होणाऱ्या मंत्री रामदास आठवले यांच्या भव्य रॅलीत व सत्कार सोहळ्यात हजारोच्या संख्येने सामील होऊन, निळ्या वादळाचे शक्ती प्रदर्शन करावे.असे आवाहन भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजक युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा रिपाइंचे बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी केले आहे.
Leave a comment