बीड/प्रतिनिधी
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चैत्र पौर्णिमेला चकलांबा येथे श्री रोकडेश्वर जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे,
यंदा या उत्सवाचे १३९ वे वर्ष आहे,तीन दिवस चालणाऱ्या या जन्मोत्सवानिमित्त दि 6 एप्रिल रोजी पौर्णिमेच्या दिवशी प्रसिद्ध लेखक आत्माराम सावंत लिखित तीन अंकी नाटक वरचा मजला रिकामा सादर करण्यात येणार आहे,जन्मोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून यावर्षी प्रेक्षकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन रोकडेश्वर प्रासादिक नाट्य मंडळाने केले आहे
श्री रोकडेश्वर प्रासादिक नाट्य मंडळ सहर्ष सादर करीत आहे आत्माराम सावंत लिखित 3 अंकी कौटुंबिक सामाजिक राजकीय नाटक वरचा मजला रिकामा यामध्ये
१ दिगंबर - संदीप पारगावकर
२ नानामामा -मयूर कुलकर्णी
३ शंभुराव-डॉ विजय सुलाखे
४ पोपट - दर्शन नाईक
५ ॲड. टूमने - किशोर खेडकर
६ लता- कु.पल्लवी कुलकर्णी
७ मंजू -कु.प्रतीक्षा कुलकर्णी नाटकाचे दिग्दर्शक-इंजि- संतोष पारगावकर सहदिग्दर्शक-एस.के. देशमुख सर,,संगीत दिग्दर्शक प्रा.सतीश सुलाखे व संपादक प्रशांत सुलाखे,सौ सुरश्री सुलाखे-सराफ
पंचपदी गायन -धनंजय सुलाखे,कालिदास चोपडे
रमाकांत देशपांडे,सुधाकर सुलाखे,श्याम कुलकर्णी
सूत्रधार -राजेंद्र मूळे विदूषक -सुभाष चोपडे,प्रमुख मार्गदर्शक-एस डी कुलकर्णी,अनिल सुलाखे,प्रशांत भालेराव,दिलीप देशपांडे,शिरीष मुळे,उदय सुलाखे,तसेच श्रीकृष्ण नाईक,पुरुषोत्तम कुलकर्णी, किशोर देशमुख,शिरीष सुलाखे,सुरेंद्र सुलाखे,अभय देशपांडे, प्रकाश देशपांडे,दिपक सुलाखे,गणेश कुलकर्णी, असून दि 6 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता होणारा वरचा मजला रिकामा हा नाट्यप्रयोग पाहण्यासाठी प्रेक्षक व भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन श्री रोकडेश्वर प्रासादिक नाट्य मंडळाने केले आहे,श्री रोकडेश्वर जन्मोत्सव तीन दिवस असून रंगीत तालीम,पालखी मिरवणूक आणि जन्मोत्सव महाप्रसाद आणि लगेच रात्री नाट्य प्रयोग सादर करण्यात येणार आहे
Leave a comment