बीड । वार्ताहर
बीड तालुक्यातील वानगाव फाटा येथील जिजाऊ गड येथे राजमाता जिजाऊ समाजप्रबोधन मंडळ यांच्या वतीने दरवर्षी 12 जानेवारी ला जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन केले जाते. गेल्या आठ वर्षांपासून जिजाऊ जन्मोत्सव सोहळा विविध उपक्रमांनी संपन्न होत असतो.यावर्षी देखील जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदना घेऊन करण्यात आली. प्रास्ताविक स्वागताध्यक्ष विनोद चव्हाण यांनी केली तर सुसेन महाराज नाईकवाडे यांचे व्याख्यान, बंडु खराडे यांचा पोवाड्याचा कार्यक्रम, मोफत आरोग्य तपासणी शिबिर आदी उपक्रमांनी हजारोंच्या उपस्थितीत हा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी शिवाजी महाराज, लक्ष्मण महाराज मेंगडे, माजी मंत्री शिवाजी दादा पंडित, डॉ.ज्योतीताई विनायकराव मेटे, नेहाताई संदिप क्षीरसागर, प्रतिभा ताई गायकवाड, ह.भ.प विष्णुपंत लोंढे महाराज,सुरेश महाराज जाधव, शरद चव्हाण, संतोष जाधव, गंगाधर नाना काळकुटे, सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, आश्रुबा रसाळ आदी उपस्थित होते. तर या कार्यक्रमाचे आयोजक राजमाता जिजाऊ समाजप्रबोधन मंडळ, बीड चे अध्यक्ष हरिश्चंद्र चव्हाण, सचिव डिगांबर जाधव, भगवान कोकाटे, धोंडिबा सावंत, राजेंद्र कुटे, दादासाहेब सादोळकर, शिवनाथ आबुज, शहादेव शिंदे, बोरखडे सर, गणपत जाधव, पी.वाय जोगदंड, रामदास जोगदंड, ज्ञानोबा जोगदंड, संतोष जोगदंड आदी तर स्वागतोत्सुक विनोद चव्हाण, सहकारी विनोद कुटे, नरेंद्र जोगदंड आदींनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. तर कार्यक्रमाची सांगता गोड जेवणाने करण्यात आली. तर स्वागत अध्यक्ष विनोद चव्हाण यांनी आभार मानले.तर मोफत आरोग्य तपासणी शिबिरासाठी डॉ.राहुल वाघमारे, डॉ.सौ.सीमा वाघमारे, डॉ.प्रविण ढगे, डॉ.शितल ढगे, डॉ.वैभव मोटे, डॉ.रमेश घोडके, डॉ.अजित घोडके, डॉ.टी.एन स्वामी, डॉ.पुनम भालेराव, डॉ.वाय.एम. मुजमुले, डॉ.हनुमंत जगताप यांच्या सह टिम उपस्थित होती.
जिजाऊंमुळे आज अंगणात तुळस आणि
मंदिरावर कळस आहेत-लक्ष्मण महाराज मेंगडे
या कार्यक्रमासाठी आवर्जून आशिर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले लक्ष्मण महाराज मेंगडे यांनी बोलताना आजच्या जिजाऊंनी मुलांवर संस्कार करण्याची गरज आहे असे म्हटले तर आज जिजाऊंमुळेच दारात तुळस आणि मंदिरावर कळस आहेत त्यामुळे विचार आचरणात आणावेत आणि संस्कार घराघरात पोहोचले पाहिजेत असंही म्हणाले.
युवकांनी व्यसनापासुन दुर राहुन स्वतःचं
करिअर घडवावे- माजी मंत्री शिवाजीदादा पंडित
या कार्यक्रमात बोलताना माजी मंत्री शिवाजी दादा पंडित यांनी तरूणांनी व्यसनापासून दूर राहून स्वतःचं करिअर घडवावं आणि सामाजिक उपक्रमातून समाजासाठी योगदान द्यावे असा युवा वर्गाला मंत्र दिला.
डॉ.ज्योतीताई विनायकराव मेटेंनी दिल्या शुभेच्छा
या जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्या दरम्यान डॉ.ज्योतीताई विनायकराव मेटे यांनी आपले मत व्यक्त करून सर्वांना जिजाऊ जन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.तर सबळ आणि सदृढ समाज घडविण्यासाठी आपण जिजाऊंचे संस्कार अंगीकारले पाहिजेत असे मत मांडले. तर सर्व महिला आणि मुलींनी माँ जिजाऊंचे संस्कार अंगीकारुन सबळ आणि सदृढ समाज घडविण्यासाठी प्रयत्न कराल अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.
तरूणांवर चांगल्या संस्कारासाठी कार्यक्रमाचे आयोजन-विनोद चव्हाण
गेल्या 8 वर्षांपासून राजकारण बाजूला ठेवून जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करत आहोत. आजकाल नाचगाणे बघण्यासाठी तरूणांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. यामुळे तरूण वाईट मार्गाला जातात. हेच रोखण्यासाठी आणि तरूणांवर चांगले संस्कार व्हावेत यासाठी जिजाऊ जन्मोत्सव सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करत आहोत असं कार्यक्रमा दरम्यान बोलताना संयोजक स्वागत अध्यक्ष विनोद चव्हाण यांनी म्हटले आहे.
-------
Leave a comment