बीड । वार्ताहर
अनिलदादा फेन्डस क्रिकेट क्लबच्यावतीने दि.11 जानेवारी 2023 पासून येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर सुरु असलेल्या राज्यस्तरीय लेदर बॉल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या पाचव्या दिवशी खेळवल्या गेलेल्या सामन्यात आदर्श क्रिकेट संघ आणि शेकाप क्रिकेट संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत पंढरपूर आणि जिमखाना बीड संघावर दणदणीत विजय मिळविला.
अनिलदादा फेन्ड्स क्रिकेट क्लबच्यावतीने जिल्हा क्रीडा संकुलावर दि.15 जानेवारी रोजीच्या सामन्यास प्रथम सत्रात प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप, शामभाऊ पडूळे, व्यापारी महासंघाचे संतोष सोहनी, शेख निजाम, सुदर्शन धांडे, सुनील अनभुले, नवनाथ प्रभाळे, अजय जाधव, योगेश बहीर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. सकाळच्या सत्रात स्वा.सावरकर क्रिकेट क्लब पंढरपूर विरुध्द आदर्श क्रिकेट संघ बीडचा सामना अतिशय रोमांचकारी ठरला. पंढरपूर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करतांना 6 फलंदाज बाद होत 20 षटकात आदर्श संघा समोर 122 धावांचे लक्ष ठेवले होते. आदर्श संघाकडून या लक्षाचा पाठलाग करतांना अतिशय तडाखेबाज फलंदाजी करत तीन फलंदाज बाद होत सदरील लक्ष सहजरित्या गाठले. 3 फलंदाज बाद 123 धावा आदर्श क्रिकेट संघाने केल्या. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार अझर अन्सारी याला देण्यात आला. तर दुपारच्या सत्रात जिमखाना बीड विरुध्द शेकाप हा सामना रंगला. शेकापने आजच्या सामन्यात तुफान फलंदाजी केली. हा सामना दै. लोकप्रश्नचे संपादक दिलीप खिस्ती,न्युज अॅण्ड व्ह्युजचे संपादक लक्ष्मीकांत रुईकर, शिवसेना नेते विजय जगताप, युवा नेते पप्पु बरीदे, नगरसेवक अमर शेख, यळंबघाटचे सरपंच बाळासाहेब शिनगारे, क्रीडा विभाग प्रमुख भालचंद्र सानप या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. शेकाप संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेकापाच्या संघाकडून फलंदाजांनी तुफान फटकेबाजीचे प्रदर्शन बीडकरांच्या डोळ्याचे पारणे फेडले. शेकाप संघाने 7 फलंदाजाच्या बदल्यात 191 अशी मोठी धावसंख्या उभारली. या धाव संख्येचा मुकाबला करण्यासाठी मैदानात उतरलेल्या जिमखाना संघाच्या फलंदाजांनी सुरुवातीला सयंमी खेळी केल्याने जिमखाना संघावर धावसंख्येची बरोबरी करण्यासाठी मोठा दबाव आल्याने जिमखाना संघ 17.2 षटकात सर्व बाद 108 धावांवर गारद झाला. सामनावीराचा पुरस्कार शेकापाचा आष्टपैलू खेळाडू सोनु सौदागर याला देण्यात आला.
एडीएफसी लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे महाक्रिकेट डॉट कॉम.,तसेच युटयुब, बीड दर्शनच्या चॅनल नं.91 वर लाव्हई प्रेक्षेपण होत असून या स्पर्धेचे बीड जिल्हावासीयांनी आनंद घ्यावा. सर्व सामने यशस्वी पार पाडण्यासाठी एडीएफसी क्रिडा मंडळाचे अध्यक्ष अजय जाधव, उपाध्यक्ष अख्तर भाई, सचिन गायकवाड, रामेश्वर घाडगे, मनोज जोगदंड,अॅड. सागर नाईकवाडे, वसीम अन्सारी, योगेश वादे, समाधान सोनवणे, पिंटूसेठ नखाते, संदीप गोरे, महेश चौरे, अॅड.सुधीर जाधव यांच्या सर्व सदस्य मोलाचे योगदान देत आहेत. तसेच मॅच साठी अम्पायर म्हणून कार्य करत आहेत सुनील वाघमारे, राहुल जाधव, गोपाळ गुरखुदे, सुनील गोपी सेट्टी समालोचक अनिल शेळके इंग्लिश कॉमेंटरी अथर्व शेळके या सर्वांचे मोलाचे योगदान आहे.
Leave a comment