बीड । वार्ताहर
राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या 58 व्या पुण्यतिथीनिमित्त मौजे खंडाळा (ता.बीड) येथे अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता.सप्ताह निमित्ताने, दरवर्षी प्रमाणे डॉ.बांगर डेंटल क्लिनिक,साठे चौक,बीडच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत दंत व मुखरोग तपासणी शिबिराला भरभरून प्रतिसाद मिळाला.
या शिबिरात डॉ.महेश बांगर यांनी शेकडो रुग्णांची मोफत दंत व मुख रोग तपासणी ,मोफत औषधोपचार केले. सर्व रूग्णांना मौखिक आरोग्य चांगले राखण्यासाठी मार्गदर्शन केले. शिबिरातील रूग्णांचे सर्व पुढील उपचार डॉ.बांगर डेंटल क्लिनिक,साठे चौक,जालना रोड ,बीड येथे सवलतीच्या दरात होतील असे आवाहन डॉ.महेश बांगर यांनी केले.समस्त खंडाळा गावकर्यांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करून सर्व ग्रामस्थांच्या वतीने लाला पाटील चौरे व प्रदीप चौरे सरांच्या हस्ते डॉ महेश बांगर यांचा सत्कार करण्यात आला. शिबिराला समस्त खंडाळकरांनी सहकार्य केल्याबद्दल डॉ.महेश बांगर यांनी आभार मानले.
-----------------------
Leave a comment