राडी । वार्ताहर
भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजाताई मुंडे हे स्वपक्षात नाराज असल्याच्या चर्चा नेहमी राजकीय वर्तुळात होत असते.तशी चर्चा होणं स्वाभाविक आहे.कारण पंकजाताई मुंडे यांना गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या कार्यक्रमाला बोलावलं जात नाही ,तसेच निमंत्रण पत्रिकेवर नाव टाकण्यात येत नसल्याने कार्यकर्ते संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत.
पंकजाताई मुंडे यांचे राजकीय खच्चीकरण करण्याचा प्रयत्न भाजपच्या काही नेत्यांकडून होत असल्याच्या प्रतिक्रिया उभ्या महाराष्ट्रातील पंकजाताई मुंडे यांच्या समर्थकांचा दावा आहे. मराठवाड्यातील कार्यक्रमाला तर सोडा पण बीड जिल्ह्यातील कार्यक्रमाला खा,प्रितम मुंडे व बीड जिल्ह्यातील महत्वाच्या नेत्या पंकजाताई मुंडे असल्याने त्यांची उपस्थिती महत्त्वाची होती मात्र त्या गैरहजर राहिल्याने पुन्हा चर्चेत आल्या. महाराष्ट्रातील प्रभावशाली ओबीसी नेत्या अशी ओळख असलेल्या पंकजाताई मुंडे यांना मराठवाड्यातील राजकीय भाजपच्या मोठ्या कार्यक्रमाला डावलल गेलं तर औरंगाबाद येथील भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष यांच्या माईकवर बोलण्यासाठी अवघे दोन मिनिटे देण्यात आली.दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या अपार कष्टामुळे आज भारतीय जनता पार्टीचा उदय महाराष्ट्रात झाला.
मराठवाड्यातील अनेक खेड्या पाड्यात वेळ प्रसंगी कधी सायकल घेऊन तर कोठे पायपीट करून भाजपचा विस्तार केला .आज त्यांच्याचीच कन्या पंकजाताई मुंडे यांना काही वर्षांपासून भाजपामध्ये राजकीय संघर्ष करावा लागतो हे दुर्दैव आहे. आयत्या पिठावर रेगुट्या मारणारे भाजपच्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत पंकजाताई मुंडे यांचा पराभव झाल्याने त्यांना मोठा धक्का बसला आणि त्यांच्या राजकीय संघर्षाचा काळ सुरू झाला मात्र संघर्षाची आपली तयारी असल्याचे त्यांनी वेळोवेळी माध्यामा समोर,जनतेच्या दरबारात स्पष्ट केले. महाराष्ट्र राज्यातील पंकजाताई मुंडे महत्त्वाच्या नेत्या असताना त्याच राजकीय पुनर्वसन होणे महत्त्वाचे असताना मात्र त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न भाजपच्या काही नेत्यांकडून होत असल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत पंकजाताई मुंडे यांच्या नाराजीचा फटका भाजपला बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेली जात आहे.
Leave a comment