चौसाळा । वार्ताहर
गावचा विकास करण्यासाठी स्थानिकची ग्रामपंचायतही ताब्यात असणे महत्वाचे असून गावचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायत हे माध्यम आहे असे सूचक प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले. चौसाळा येथील ग्रमस्थांच्या व सरपंच उपसरपंच व नव निर्वाचित सदस्य यांच्या वतीने जयदत्त क्षीरसागर यांचा जाहीर सत्काराचे 13 जानेवारी रोजी करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
आपल्या सत्कार समारंभात जयदत्त क्षीरसागर यांनी प्रथम चौसाळा येथील सर्व जातीपातीचा नागरिकांनी आमच्या वर विश्वास ठेवून आमच्या पॅनला सहकार्य केले याबद्दल सर्व मतदार बांधवांच्ये आभार मानले. गावातील लोढा बंधुचे एकच ब्रीद वाक्य आहे शब्द दिला तर पळणारच त्याला फारकत नाही अशे सांगून सर्वश्री बाबूसेठ लोढा, उपसरपंच अंकुशराव काळसे, बिपीन लोढा, नितीनसेठ लोढा, भारत चौधरी, मोहन झोडगे, आदीचे सहकार्य लाभले या बद्दल आभार मानले. भीमाशंकर साखर कारखान्याचे सर्वश्री. नितीनसेठ लोढा यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून जयदत्त आण्णा यांच्या आम्ही तुमच्या खंबीरपणे पाठीशी उभे असून आपण पुढील आमदार पदासाठी उमेदवाराची वाटचाल सुरू करावी आम्ही सर्व जण तुम्हाला सहकार्य करू असे चुचवीले या जाहीर सत्कार सभारभंला जगदीश काळे, अरुण दाके, दिनकर कदम, धनराज वाघमारे, तागंडे. ग्रामविकास अधिकारी नागरे, प्राचार्य आवारे, प्रा.पंडित गुंजाळ, दत्ता शिंदे, बाबासाहेब चव्हाण, चेअरमन पिंटू नायकवाडे, यांच्या सह गावातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य. विलास भिल्लारे यांनी केले.
Leave a comment