चेअरमन धैर्यशील सोळंके यांची माहिती
माजलगाव । वार्ताहर
लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याचा सन. 2022-23 चा गळीत हंगाम सुरु असुन या चालू हंगामात आज 49 दिवसअखेर 272500 मे. टन ऊसाचे गाळप करून सरासरी 10.32% साखर उता-याने 163810 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतलेले आहे. उप प्रकल्प उत्पादनाचे माध्यमातुन आजअखेर 6565773 लिटर इथेनॉलचे उत्पादन घेण्यात आले तर 11769944 युनीट विज विज वितरण कंपनीस विक्री करण्यात आलेली आहे.
या गळीत हंगामासाठी कारखाना व्यवस्थापनाने 10.00 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चीत केलेले आहे. गळीत हंगाम 2023- 2024 मध्ये आपले कारखान्याने प्रतिदिन 7000 मे.टन गाळप क्षमतेने चालविणेचे नियोजन केलेले आहे. यासाठी कारखाना व्यवस्थापनाने माहे जानेवारी व 15 फेब्रुवारी 2023 या कालावधीत को.सी.86032 व को.एम. 8005 या ऊस जातीची जास्तीत जास्त लागवड करुन घेणेचे नियोजन आहे. ज्या सभासदांना ऊसाची लागवड करावयाची आहे त्या सभासदांनी प्रथम विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच ज्या सभासदांना माहे फेब्रुवारी- 2023 मध्ये रोपाची लागवड करावयाची आहे. त्यांनी शेती खात्याचे विभागीय कार्यालयास किंवा कारखाना येथील ऊस विकास विभागाशी संपर्क साधुन रोखीने रक्कम जमा करुन रोपाची मागणी नोंदवावी. त्याप्रमाणे नर्सरीमधुन ऊसाचे रोपाची. उपलब्धता करुन देणेचे नियोजन आहे. तरी सभासदांनी वरील धोरणाप्रमाणे मुदतीत ऊस लागवड करावी असे आवाहन कारखान्याचे चेअरमन धैर्यशील सोळंके यांनी केले आहे.
-------
Leave a comment