गेवराई । वार्ताहर
गेवराई येथे संत भाऊ-बाबा सेवा प्रतिष्ठान, गेवराई यांच्या वतीने संत भगवानबाबा व संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त नाईक नगर येथे सुरु असलेल्या 18 व्या कीर्तन महोत्सवात दि.14 जानेवारी रोजी समाज प्रबोधनकार, निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे सायं 5 ते 7 या वेळेत कीर्तन होणार आहे.अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय तांदळे, सचिव तथा जेष्ठ पत्रकार शिवाजी मामा ढाकणे यांनी केले
गेल्या सात दिवसापासून संत भाऊ-बाबा सेवा प्रतिष्ठान, गेवराई यांच्या वतीने संत भगवानबाबा व संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त नाईक नगर येथे सुरु असलेल्या 18 व्या कीर्तन महोत्सवात महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकारांनी ज्ञान मंडपात आपली उपस्थिती लावून ज्ञान प्रबोधनाचे धडे दिले. तर दि.14 जानेवारी रोजी समाज प्रबोधनकार, निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे सायं 5 ते 7 या वेळेत कीर्तन होणार आहे. तरी भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संत भाऊ-बाबा सेवा प्रतिष्ठानच्या पदाधिकार्यांनी केले आहे.
Leave a comment