गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा- सुभाष खळगे यांचे आवाहन
वडवणी । वार्ताहर
माजलगाव मतदार संघाचे लोकप्रिय आमदार प्रकाश दादा सोळंके यांचा आज दिनांक 14 जानेवारी रोजी वाढदिवस असून त्यानिमित्त वडवणी तालुक्यातील काडीवडगाव येथे सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मोफत मोतीबिंदू व स्त्री रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे तरी पंचक्रोशीतील जनतेने याचा लाभ घ्यावा असे आवाहन युवा नेते सुभाष खळगे यांनी केले आहे
या बाबत अधिक माहिती अशी कि माजलगाव मतदार संघाचे लोकप्रिय आमदार तथा माजी मंत्री प्रकाश दादा सोळंके यांच्या वाढदिवसानिमित्त काडी वडगाव येथे आज दिनांक 14 जानेवारी रोजी भव्य मोफत मोतीबिंदू व स्त्री रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिरात नेत्र रोग तज्ञ डॉक्टर चंद्रकांत वाघ व स्त्री रोग तज्ञ डॉक्टर मनीषा मुंडे सहभाग नोंदवणार आहेत या कार्यक्रमास स्वतः सत्कारमूर्ती आमदार प्रकाश दादा सोळंके हे उपस्थित राहणार आहेत तर या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून वीरेंद्र सोळंके तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे उपस्थित राहणार आहेत तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षपदी लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय धैर्यशील काका सोळंके हे असणार आहेत या कार्यक्रमास युवा नेते जयसिंह भैया सोळंके यांची उपस्थीती राहणार आहे तरी काडीवडगाव परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन युवा नेते सुभाष खळगे पाटील यांनी केले आहे.
Leave a comment