बीड । वार्ताहर
बीड शहरातील पिंपरगव्हाण रोड व दिप हॉस्पिटल समोरील सुरु असलेल्या सिमेंट रस्ता व नाली कामाची आज माजी नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांनी पाहणी केली.
या भागातील सर्व नागरिकांना मी गेल्या निवडणुकीच्या काळात या रस्त्यांबद्दल शब्द दिला होता,जो मला या नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत मार्गी लावता आला याचे मला मनस्वी समाधान आहे. शेवटी मी तुमच्या आशिर्वादाने या खुर्चीवर आहे तुम्ही मला ही संधी दिली म्हणून आदरणीय आण्णांच्या मार्गदर्शनखाली आपण हे काम पूर्ण करु शकलो.पिंपरगव्हाण रोडला वाढलेले नागरिकरण पहाता हा रस्ता त्यांच्या साठी खुप गरजेचा होता.व दिप हॉस्पिटल समोरचा रस्ता देखील महत्त्वाचा होता जो की,पेठेतुन येणार्या व खासबाग,जुना बाजार परिसरातुन येणार्या नागरिकांना थेट वरील बीडशी कनेक्ट करतो. हा दुरदृष्टीकोन ठेवुन आपण हे काम करु शकलो.सध्या बीड शहरातील विविध भागात सिमेंट रस्त्यांची कामे सुरु असुन,काही उर्वरित रस्ते लवकरच आपण पाठपुरावा करुन सुरु करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.यासमयी नगरसेवक,पदाधिकारी,कार्यकर्ते,परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.
Leave a comment