जुनी चव आता नव्या रुपात
बीड । वार्ताहर
‘माया’ चहाची बीडकरांना भुरळ घातली आहे. शहरातील सारडा कॅपिटरल समोरील सिध्दीविनायक कॉम्प्लेक्समध्ये सचिन उबाळे आणि उबाळे परिवाराच्या वतीने ‘माया चहा’चे दालन पंधरा दिवसांपूर्वी सुरु करण्यात आले आहे. अस्सल बीडची ओळख म्हणजे ‘माया चहा’ होय. हीच माया चहाची जुनी चव आता बीडकरांसाठी नव्या रुपात पुढे आणली गेली आहे. आजपर्यंत अनेक बीडकरांनी ‘माया चहा’च्या बॅ्रन्डचा स्वाद घेत कौतूक केले आहे. किशोर नाना उबाळे यांच्या हस्ते माया चहा दालनाचे उद्घाटन संपन्न झाले. याप्रसंगी उबाळे परिवारासह मान्यवरांची उपस्थिती होती.
‘माया घट्ट चहाचा पारंपारिक स्वाद’, ‘माया’, चहाचं दुसरं नाव एकदम अस्सल, तसेच बीड की चाय की है अपनी बात, माया चाय भी होती है खास,एक बार जो लगे जुबान से नही जाता फिर इसका स्वाद’ ही आणि इतर भींतीवरील घोषवाक्य बीडकरांची लक्ष वेधून घेतात.
बीड आणि माया चहाचं नातं तसं खूप वर्षांचे आहे. आता हीच माया चहाची ओळख उबाळे यांनी आपल्या ब्रँडच्या माध्यमातून समोर आणली आहे. हे दालन सुरु होवून पंधरा-वीस दिवसांचा कालावधी लोटला आहे. या दरम्यान हजारो बीडकरांनी ‘माया’ चहाचा आस्वाद घेतला आहे. अनेकांनी सचिन उबाळे,अभिजित उबाळे यांचे या बँन्डबद्दल कौतूकही केले आहे.
Leave a comment