बीड । वार्ताहर
जुलै 2022 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल घोषित झाला असून यंदा संस्कार विद्यालय माध्यमिक विभाग, बीडचे एकूण 06 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत. एकूण 20 विद्यार्थी या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले होते त्यापैकी अंतिमत: 06 विद्यार्थी हे शिष्यवृत्तीधारक म्हणून घोषित करण्यात आले.
यामध्ये चि. पुष्कराज शरद वाघमारे (236) शहरी(35)- प्रथम,चि. रितेश किशोर जाधव (228) शहरी(49)-द्वितीय, चि. आयुष महेशकुमार लहाने (216) शहरी तृतीय, कु. यशश्री चंद्रकांत नाईकनवरे (210) शहरी(92)- चौथा, चि. सत्यम अनिल शिंदे (210) शहरी-77 (93)- पाचवा, चि. ओंकार युवराज घोडके (208) शहरी(102)- सहावा या सर्व गुणवंतानी स्पृहणीय यश संपादित करून संस्कार विद्यालयाचा शैक्षणिक इतिहास अबाधित ठेवला. व आपल्या विजयाचा कीर्ती ध्वज फडकवला. संस्कार प्रबोधिनीचे संस्थाध्यक्ष डॉ.श्री.शरदजी रायते, उपाध्यक्ष नामदेवराव क्षीरसागर, सचिव अॅड. कालिदासराव थिगळे, सतीश दण्डे, दिलीप खिस्ती, सुनील क्षीरसागर, डॉ.अनुराग पांगरीकर, डॉ.रेणुकादास जिंतूरकर, भाऊसाहेब बोबडे व सर्व संचालक तसेच मुख्याध्यापक सतीश गंधे, पर्यवेक्षक राजेश राजहंस, व इतर सर्व शिक्षकवृंदानी गुणवंत शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
-------------
Leave a comment