आष्टी । वार्ताहर
जिल्हा परिषद माध्यमिक शाळा दादेगाव ता आष्टी जिल्हा बीड या प्रशालेतील सर्व माध्यमिक शिक्षकांनी एकत्र येऊन शासनाने दि 28 डिसेंबर 2022 रोजीच्या काढलेल्या शासन अधिसूचनेचा काळ्या फीती लावून निषेध नोंदवला.
आष्टी तालुक्यातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षकांनी निषेध म्हणून काळ्याफिती लावून निषेध नोंदवला आहे मागील पन्नास वर्षापासून जिल्हा तांत्रिक सेवा गट तीन श्रेणी दोन अंतर्गत जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षकांसाठी पदोन्नतीची एकमेव संधी उपलब्ध आहे उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदावर या अधिसूचनेमुळे माध्यमिक शिक्षकांच्या पदोन्नतीवर परिणाम होणार आहे तसेच त्यांचे योगदान खूप मोलाचे होणार असल्याने तसेच मराठवाडा व विदर्भातील शोषित वंचितांच्या हक्काच्या जिल्हा परिषद माध्यमिक शाळा जिवंत ठेवून गुणवत्ता धारक विद्यार्थी घडवत असतानाही अधिसूचना जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षकांवर अन्याय करणारी आहे शासनाने ही अधिसूचना मागे घेऊन माध्यमिक शिक्षकांना उपरोक्त पदोन्नतीच्या समावेशाची आधीसूचना काढावी अशी मागणी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा माध्यमिकशिक्षकांकडून केली जात आहे यासाठी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा दादेगाव तालुका आष्टी जिल्हा बीड येथील सर्व माध्यमिक शिक्षकांनी एकत्र येऊन 28 डिसेंबर 2022 च्या शासन निर्णयाचा निषेध नोंदवला आहे जिल्हा परिषद शिक्षक संघटना शाखा आष्टी पाटोदा शिरूर तालुका अध्यक्ष रवींद्र भोसले व सचिव गायकवाड नानासाहेब त्याचप्रमाणे उपाध्यक्ष सतीश दळवी व इतर पदाधिकारी यांनी हा निषेध नोंदवून ही अधिसूचना रद्द करा असे ठरवले आहे.
Leave a comment