अजित पवारांनी ब्रीच कॅन्डीमध्ये भेटून केली तब्येतीची विचारपूस
खा.शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,खा.सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांनीही केली फोनवरून चौकशी
मुंबई । वार्ताहर
माजी मंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या अपघातानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात पुढील उपचारार्थ दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांच्या छातीमध्ये किरकोळ मार असून ते सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत त्यांच्या तब्येतीबाबत कोणत्याही प्रकारचे काळजीचे कारण नसल्याचे कळविण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांच्यासह ज्येष्ठ नेते खासदार सुनील तटकरे, आ. अनिकेत तटकरे हे ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेऊन आस्थावाईक पणे चौकशी करत पुढील उपचाराबाबत रुग्णालय प्रशासनास सूचना करत धनंजय मुंडे यांना लवकर बरे होण्याबाबत सदिच्छा व्यक्त केल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार सौ सुप्रियाताई सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासह राज्यातील अनेक मान्यवर नेत्यांनी धनंजय मुंडे यांची फोनवरून चौकशी केली असून त्यांना लवकर आराम मिळावा याबाबत आपल्या सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीला काल मध्यरात्रीनंतर मतदारसंघातील दौरा आटपून परळी कडे जात असताना अपघात झाला व या अपघातात ते किरकोळ जखमी झाले होते; परंतु धनंजय मुंडे यांच्या अपघाताची वार्ता सबंध राज्यात वार्यासारखी पसरली व सबंध राज्यभरातून धनंजय मुंडे यांच्या शुभचिंतकांकडून काळजी व्यक्त करत त्यांना लवकर आराम मिळावा व त्यांनी पुन्हा एकदा पूर्ववत जनसेवेत दाखल व्हावे याबद्दल त्यांच्या बाबत सदिच्छा व्यक्त करण्यात येत असून अनेक हितचिंतक हे प्रार्थना करत आहेत.दरम्यान धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असून ते सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात पुढील उपचार घेत आहेत.
Leave a comment