अखेर आष्टी-साबलखेड राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला मिळाला मुहूर्त
आष्टी । वार्ताहर
आष्टी ते साबलखेड हा राष्ट्रीय महामार्ग अत्यंत खराब झालेला होता. गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याच्या कामाला अखेर आता सुरुवात झाली असून सदरील सतरा किलोमीटरचा रस्ता हा सिमेंट काँक्रीटचा होणार आहे. त्याचबरोबर रस्त्याचे मोठ्या प्रमाणात रुंदीकरण होत असल्याने अतिक्रमणधारकांची मात्र असा पाचावर धारण बसली आहे.या मार्गाचे आता प्रत्यक्ष काम सुरू होणार असून कडा शहरांमध्ये तब्बल 300 पेक्षा जास्त अतिक्रमणे उठणार आहेत.
सदरील रस्ता कडा शहरांमध्ये तब्बल 100 फुटाचा रुंद होणार असून शहराचा बाहेर मात्र 33 फूट रुंद रस्ता होणार आहे. बुधवारी या रस्त्याचे काम देशमुख अँड कंपनीला मिळाले आहे. त्यातील वरिष्ठ अधिकार्यांनी येऊन आराखडा बाबत पाहणी केली. गेल्या अनेक दिवसापासून आष्टी ते साबलखेड या 17 किलोमीटर राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडून अनेकांना जीव गमावावा लागला होता.या संदर्भात माध्यमानेही वेळोवेळी आवाज उठवला होता. मात्र तब्बल गेल्या वर्षी जानेवारीमध्ये सदरील रस्त्याला निधी आला होता तरीही निविदा प्रक्रिया व अन्य तांत्रिक बाबींमध्ये हा रस्ता अडकून पडला होता. त्याची गेल्या दोन महिन्यापूर्वी निविदा झाली पण आता प्रत्यक्षात आष्टी ते साबलखेड या 17 किमी अंतरावर असणार्या राष्ट्रीय महामार्गाच्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला प्रारंभ करण्यात आला आहे.
जामखेड -नगर राष्ट्रीय महामार्ग हा कडा ते साबलखेड या 17 किलोमीटर अंतरावर अत्यंत खराब झालेला होता. या मार्गाचे आता प्रत्यक्ष काम सुरू होणार असून कडा शहरांमध्ये तब्बल 300 पेक्षा जास्त अतिक्रमणे उठणार आहेत. कडा शहरांमध्ये महेश मंदिर ते भारत पेट्रोल पंप हा 100 फूट रुंदीचा रस्ता होणार असून शहराबाहेर 33 फूट रुंदीचा रस्ता होणार आहे. शिवाय कडा शहरातील कडी नदीवरील पूल हा सहा पदरी होणार असून सदरील पूल पाडून नवीन पूल तयार करण्यात येणार आहे.
Leave a comment