माजलगाव । वार्ताहर
तालुक्यातील सोयाबीन पिकाचे मंडळ निहाय नुकसानी प्रमाणे विमा भरपाई रक्कम माजलगाव 33 हजार रुपये ,किट्टी आडगाव 38 हजार ,मजरथ30 हजार, तालखेड 28 हजार, गंगामसला 28 हजार व दिद्रुड 29 हजार या प्रमाणे विमा भरपाई रक्कम मिळाली पाहिजे या मागणीसाठी दि 4 जानेवारी रोजी माजलगाव तहसील कार्यालयासमोर शेतकरी नेते अशोकराव नरवडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.
तहसीलदार श्रीमती वर्षा मनाळे यांच्या समोर शेतकर्यांची आक्रमक बाजू अशोकराव नरवडे यांनी मांडली. दोन्ही बाजूंची माहिती तहसीलदार मनाळे यांनी ऐकून घेत माजलगाव तालुक्यासाठी नेमाऊन दिलेले बजाज अलंयन्सचे पीक विमा प्रतिनिधी प्रसाद सावंत यांना शेतकर्यांचे सर्व विमा प्रकरणे आठ दिवसात निकाली काढा असा आदेश दिल्याने शेतकर्यांनी सदरील आंदोलन मागे घेतले मात्र सात दिवसात आमच्या हक्काचे पैसे न मिळाल्यास आम्ही परत लोकशाही मार्गाने हे आंदोलन सुरू करू असेही नरवडे यांनी सांगितले या वेळी तालुका कृषी अधिकारी शिवप्रसाद संगेकर,शेतकरी नेते अशोकराव नरवडे ,संतोष तौर ,शिवाजी तौर ,पांडुरंग तौर ,बाळासाहेब तौर, रुस्तुम तौर व बालासाहेब जावळे आदी शेतकरी उपस्थित होते.
Leave a comment