माजलगाव । वार्ताहर
माजलगाव तालुका पत्रकार संघाच्या पुरस्कारांचे वितरण उद्या दि.6 जानेवारी रोजी आमदार प्रकाश सोळंके, भाजपा नेते रमेशराव आडसकर, बाबुराव पोटभरे यांचेसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण दि. 6 जानेवारी शुक्रवार रोजी करण्यात येणार आहेत.माजलगाव तालुका पत्रकार संघाचा दर्पण पुरस्कार जेष्ठ संपादक रामानंद नानकराम लड्डा यांना तर माजलगाव भुषण पुरस्कार वे.शा.सं. अनंतशास्त्री जोशी यांना जाहिर करण्यात आला असुन ता. 6 जानेवारी शुक्रवार रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी जेष्ठ पत्रकार संतोष मुळी हे तर माजी आमदार डि. के. देशमुख, माजी आमदार मोहनराव सोळंके, माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील, माजी आमदार आर. टी. देशमुख, छत्रपती कारखान्याचे उपाध्यक्ष मोहन जगताप, माजी सभापती अशोक डक, उपविभागीय अधिकारी निलम बाफणा, उपविभागीय पोलिस अधिकारी धिरजकुमार बच्चु, तहसिलदार वर्षा मनाळे, जय महेशचे जनरल मॅनेजर पारसनाथ जायसवाल यांची उपस्थिती असणार आहे. लोकनेते सुंदरराव सोळंके महाविद्यालयात ता. 6 शुक्रवार सकाळी 10.30 वाजता होणा-या पुरस्कार वितरण होणार आहे. यावर्षी दिला जाणारा दर्पण पुरस्कार हा जेष्ठ संपादक रामानंद लड्डा यांनी मागील 25 ते 30 वर्षांपासुन माजलगाव तालुक्याच्या विकासात केलेल्या लिखानासंदर्भात माजलगावचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व भौगोलिक विकासाचे साक्षीदार हे संपादक रामानंद लड्डा आहेत. त्यांनी याबाबत आपल्या लेखणीतुन सतत आवाज उठविला आहे. त्यांच्या या कामाची पावती म्हणुन त्यांचा हा गौरव करण्याचे आयोजन माजलगाव पत्रकार संघाने केले आहे तर माजलगाव तालुका तसेच संपुर्ण मराठवाड्यात पौराहित्यासोबतच समाजसेवा त्यांनी सातत्याने स्विकारून एक आगळे वेगळे स्थान निर्माण केले आहे. मुर्ती लहान पण किर्ती महान असे व्यक्तीमत्व असणारे वे.शा.सं. अनंतशास्त्री जोशी यांना माजलगाव भुषण पुरस्कार देउन गौरविण्यात येणार आहे. तरी शहरातील व परिसरातील जनतेने या कार्यक्रमास उपस्थित राहुन दर्पण दिनानिमीत्त शुभेच्छा द्याव्यात असे आवाहन पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष उमेश मोगरेकर, जिल्हाध्यक्ष तुकाराम येवले, सचिव दिनकर शिंदे, कार्याध्यक्ष कमलेश जाब्रस, उपाध्यक्ष दत्ता येवले, पत्रकार अरविंद ओव्हाळ, पत्रकार महेंद्र मस्के यांनी केले आहे.
---------
Leave a comment