माजलगाव । वार्ताहर
विधानसभेत केलेले वक्तव्य मागे घ्यावे आणि हिंदूंची माफी मागावी अशी मागणी माजलगाव भाजपाच्या वतीने तहसीलमध्ये निवेदन देऊन तहसीलदार मनरळे मॅडम यांच्याकडे करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेवरून व लोकनेत्या पंकजा मुंडे व खा.प्रीतम मुंडे रमेशराव आडसकर, राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली आज तहसीलमध्ये निदर्शने करून निवेदन देण्यात आले.
आमच्यासाठी छत्रपती संभाजी महाराज कायमच धर्मवीर होते, आहेत आणि राहणार हे पुन्हा एकदा सांगण्याची वेळ आली आहे आणि त्यांच्या धर्मवीरतेबद्दल तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही म्हणून अजित दादांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो विरोधी पक्षनेते या जबाबदार पदावर असताना आणि लोकशाहीची पवित्र मंदिर असलेल्या विधान भवनामध्ये बोलताना अजित दादांनी इतिहासाची नीट उजळणी करून येऊन बोलणे अपेक्षित होते तसे न करता छत्रपती संभाजी महाराजांच्या कर्तुत्वाला कमी लेखण्याची काम त्यांनी आपल्या वक्तव्याने केले आहे त्यामुळे विधानसभेत केलेले वक्तव्य अजित दादांनी मागे घ्यावे आणि हिंदूंची माफी मागावी अशी मागणी आज माजलगाव भाजपा च्या वतीने करण्यात आली.
यावेळी तालुकाध्यक्ष अरुण राऊत, बीड जिल्हा सचिव बबन सोळंके, माजी नगराध्यक्ष डॉ अशोक तिडके, डॉ.प्रशांत पाटील, दीपक मेंडके, सत्यनारायण उनवणे राजेश साळवे बबन शिरसट विनायक रत्नपारखी प्रल्हाद दळवी पांडुरंग झोडगे, भागवत शेळके, दत्ता महाजन, उपशहर अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, प्रल्हाद दळवी, किसन वगरे, शेख आयुब, दत्तात्रय क्षीरसागर सतीश जोशी, मनोज फडके, तुळशीराम बडे यासह भाजपा पदाधिकारी शक्ती प्रमुख बूथ प्रमुख कार्यकर्ते सरपंच उपस्थित होते.
Leave a comment