माजलगाव । वार्ताहर
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 192 वी जयंती येथील श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम 5 वी ते 7 वी व 8 वी ते 10 वी या दोन्ही विभागात घेण्यात आला. 8 वी ते 10 वी विभागातील कार्यक्रमाचे अध्यक्ष पर्यवेक्षक उमेश थाटकर तर प्रमुख अतिथी चेतन धुरंधरे हे होते तर व्यासपीठावर उपमुख्याध्यापक विठ्ठलराव काळे, पर्यवेक्षक रवींद्र खोडवे, अभ्यास पूरक मंडळ प्रमुख विशाल ठोसर इत्यादी उपस्थित होते.
यावेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. कु बालीका ढवळे व कु रोहिणी जोशी या विद्यार्थीनींनी सावित्रीबाई फुले यांच्या विषयी माहिती सांगितली तसेच प्रमुख अतिथी चेतन धुरंधरे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याविषयीं माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. या कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप उमेश थाटकर यांनी केले तर प्रास्ताविक कु अनुष्का कुरे, आभार कु प्रणाली होके, सुत्रसंचालन कु सृष्टी कुरे, कु अपुर्वा शिंदे, कु स्नेहा बडेकर यांनी केले. 5 वी ते 7 वी विभागातील कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती कुसुमावती बडेराव तर प्रमुख अतिथी श्रीमती सुनंदा खांडेकर या होत्या. तर व्यासपीठावर उपमुख्याध्यापक विठ्ठलराव काळे, पर्यवेक्षक मिलिंद वेडे, कमलाकर झोडगे, अभ्यास पूरक मंडळ प्रमुख शिवशंकर भंडारे इत्यादी उपस्थित होते. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यानंतर कु विद्या मेंडके हिने मनोगत व्यक्त केले. तसेच श्रीमती सुनंदा खांडेकर यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याविषयी माहिती आपल्या मनोगतातून व्यक्त केली. या कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप श्रीमती कुसुमावती बडेराव यांनी केले तर प्रास्ताविक श्रीमती प्रज्ञा देशपांडे, आभार श्रीमती अंजली वाघमारे तर सुत्रसंचालन कु शर्वरी यादव हिने केले. या कार्यक्रमाची सांगता शांती मंत्राने झाली.
Leave a comment