व्यसनमुक्ती जनजागृती रॅलीचा समारोप प्रसंगी उपस्थिती
बीड | वार्ताहर
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सकाळी बीड शहरात दाखल झाले.कै.अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठान व मेटे परिवार आयोजित व्यसनमुक्ती जनजागृती रॅलीच्या समारोपप्रसंगी त्यांची प्रमुख उपस्थिती आहे. तत्पूर्वी नगर रोडवरील पोलीस मुख्यालयावर त्यांचे आगमन झाल्यानंतर शिवसंग्रामच्या वतीने श्रीमती डॉ.ज्योती विनायकराव मेटे यांच्यासह रामहरी मेटे, आशुतोष विनायक मेटे आणि शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसंग्रामचे अध्यक्ष दिवंगत आमदार विनायक मेटे यांनी उदात्त भावनेतून व्यसनमुक्तीची चळवळ आरंभली.कोणताही तरुण व्यसनाधिनतेकडे न जाता चांगल्या आरोग्याचा संकल्प करून नवीन वर्षाचे स्वागत करावे यासाठी प्रतिवर्षीप्रमाणे सुरू केलेली व्यसनमुक्तीची ही चळवळ याही वर्षी चालू आहे याचाच एक भाग म्हणून कै.अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठान व मेटे परिवार आयोजित व्यसनमुक्ती महारॅलीचे आयोजन आज 31 डिसेंबर रोजी सकाळी ठीक 7.30 वाजता झाला.
व्यसनमुक्त बीड अभियानांतर्गत आयोजित व्यसनमुक्ती महारॅलीचा आरंभ श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणापासून झाला. त्यानंतर सुभाष रोड- माळीवेस - बलभीम चौक - कारंजा रोड - बशीरगंज - छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे ही मारली डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नगर रोड बीड येथे पोहचली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महा रॅलीचा समारोप होणार आहे.
Leave a comment