बीड । वार्ताहर
खंडाळा ग्रामपंचायत उपसरपंच पदासाठी दि.30 शुक्रवारी निवडणुक प्रक्रिया पार पडली. यामध्ये पाच विरुद्ध तीन असे मतदान होऊन शेषराव आंधळे हे विजयी झाले. दि.30 डिसेंबर रोजी खंडाळा येथील उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली.याप्रसंगी निवडून आलेले सर्व उमेदवार तसेच सरपंच ज्योती राजरतन जायभाये यांनीही यावेळी आपला पदभार स्वीकारला.
यामध्ये उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गावातील मंडळींनी प्रयत्न केले परंतु बिनविरोध झाली नाही. यामध्ये मतदान होऊन शेषराव दादाराव आंधळे पाच विरुद्ध तीन या फरकाने विजयी झाले.त्याबद्दल गावकरी व सर्व मित्र मंडळ यांच्यातर्फे त्यांना पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मंगल नंदू जायभाये, भागाबाई लक्ष्मण केकान, हौसराव भगवान चौरे, तसेच विरोधी गटातील यमुना भास्कर केकान, बंटी चौरे, सौ.बांगर यांच्यासह आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी गावातील सन्माननीय लाला पाटील चौरे बाबा काका चौरे, बाबासाहेब जायभाये,नंदू अण्णा जायभाये, प्रकाश चौरे, गुंडीबा चौरे, लक्ष्मण केकान यांचीउपस्थिती होती. यावेळी मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी विस्तार अधिकारी डोंगरे, ग्रामसेवक योगी, पो.का. नागरगोजे यांची उपस्थित होते.
Leave a comment