कपिलधार येथे मंत्री महोदयांचा मनमोहन कलंत्रीसह पदाधिकार्यांकडून सत्कार
बीड । वार्ताहर
केंद्रीय खत राज्यमंत्री भगवंतजी खुबा आज सपत्नीक कपिलधार (ता.बीड) येथे धार्मिक कार्यक्रमासाठी आले असताना ऑल इंडिया ऍग्रो इनपुट डीलर्स असोसिएशन नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष मनमोहन कलंत्री व संस्थेच्या सर्व सभासदांकडून भव्य स्वागत करण्यात आले. याप्रसंगी मंत्री महोदयांना रासायनिक खत विक्री करताना खत विक्रेत्यांना येणार्या अडचणी बाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावर मंत्री महोदयांनी खत विक्रेत्यांच्या सर्व अडचणीचे समाधान केंद्र सरकारच्या माध्यमातून करू असे विक्रेत्यांना यावेळी आश्वासित केले.
खत विक्रीमधील मार्जिन गेली 30 वर्षापासून वाढलेले नाही ही गोष्ट मनमोहन कलंत्री यांनी खतमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली त्यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन आपणास कळविण्यात येईल असे यावेळी स्पष्ट केले. या कार्यक्रमांमध्ये व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष सोहनी यांची मराठवाडा विभागाचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माननीय मंत्री महोदयांनी त्यांचा सत्कार केला. कार्यक्रमासाठी बीड येथील प्रमोद निनाळ, जयकिशोर बियाणी, गणेश भोज, सुशील कासट, संकल्प मंत्री, संदीप मस्के, सतीश खांडे, हेमंत बियाणी, संदीप कासट, मुन्ना शेळके, दिगंबर भोसले योगेश मंत्री, परीक्षेत कलंत्री, मनमतस्वामी कुट्टे, अनिल साळुंखे, दत्ता घरात, महेश मानूरकर,इत्यादी विक्रेते बांधव उपस्थित होते.
Leave a comment