बीड | वार्ताहर
बीड नगर पालिकेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांची बदली करण्याचे आदेश शासनाचे अव्वर सचिव अ.का.लक्कस यांनी 29 डिसेंबर रोजी जारी केले आहेत. आता बीड नगर पालिकेच्या मुख्याधिकारीपदी बीड जिल्हा प्रशासन अधिकारी नीता अंधारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज दुपारी नीता अंधारे यांनी मुख्याधिकारी म्हणून पदभार स्विकारला. व्यापारी महासंघाच्या वतीने त्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला. नीता अंधारे यांच्या रूपाने बीड नगरपालिकेला पहिल्या महिला मुख्याधिकारी लाभल्या आहेत.
मुख्याधिकारी या गट ब संवर्गातील अधिकारी उमेश ढाकणे यांची प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान ढाकणे यांना कार्यमुक्त करण्यात आल्यानंतर त्यांच्या नियुक्तीचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमीत करण्यात येणार असल्याचे शासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन अधिकारी निता अंधारे यांच्याकडे बीड न.प.चे मुख्याधिकारीपद सोपविण्यात आले आहे.
बीडपूर्वी मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी गेवराई न.प.चे मुख्याधिकारी म्हणून काम पाहिले होते. बदली आदेश जारी झाल्यानंतर नीता अंधारे यांनी आज दि.30 डिसेंबर रोजी दुपारी पदभार स्विकारला आहे. त्यांच्या रूपाने बीड नगरपालिकेला पहिल्या महिला मुख्याधिकारी लाभल्या आहेत.
Leave a comment