सरपंचपदी सौ.मंगलताई लोढा यांचा विजय
बीड | वार्ताहर
बीड तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या चौसाळा ग्रामपंचायतमध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे सहकारी प्रेमचंद उर्फ बाबूशेठ लोढा यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पत्नी मंगल लोढा यांनी मोठा विजय मिळवला आहे. लोढा यांच्या पॅनलमधील 15 पैकी 12 सदस्य विजयी झाले आहेत. तर विरोधी गटातील तीन सदस्य विजयी झाले आहेत.या ग्रामपंचायत मध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या पॅनलचा मात्र पराभव झाला.बीड तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतमध्ये आमदार क्षीरसागर यांना मोठा फटका बसला आहे.
बीड तालुक्यातील सर्वात मोठ्या अन प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या चौसाळा ग्रामपंचायत निवडणुकीत विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पॅनलचा धुवा उडाला असून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे सहकारी असणारे प्रेमचंद लोढा यांच्या पॅनलचा मोठा विजय झाला आहे लोढा यांच्या पत्नी मंगलताई या सहाशेपेक्षा अधिक मताधिक्क्याने विजयी झाल्या आहेत.
Leave a comment