नेकनूर । वार्ताहर
ग्रामपंचायत निवडणुकीतील मतदानासाठी औरंगाबाद येथून केज तालुक्यातील आनंदगाव सारणीकडे चाललेल्या दुचाकीस्वराची समोरून येणार्या कारला मांजरसुंबा-नेकनूर रस्त्यावर धडक बसल्याने यामध्ये दुचाकीवरील तरुण जागीच ठार झाला.
श्रीकृष्ण अनिल गायकवाड (वय 35) असे मयताचे नाव आहे. हा तरुण औरंगाबाद येथून दुचाकीवर क्र.(एमएच क्र.20 सीएक्स 1102) केज तालुक्यातील आनंदगाव सारणी येथील ग्रामपंचायत मतदानासाठी जात असताना मांजरसुंबा-नेकनूर रस्त्यावरील गवारी पाटी नजीक समोरुन येणार्या कारला क्र.(एम.एच.20 एल 7009) या गाडीला धडक बसली. अपघातातील या युवकाला नेकनूरच्या रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
Leave a comment