प्रेयसीवर बलात्कार झाला, न्याय मिळेना म्हणून उचलले टोकाचे पाऊल
मुंबई | वार्ताहर
मंत्रालयात एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला.17 नोव्हेंबर रोजी मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक सुरु असतानाच तरुणाने सहाव्या मजल्यावरुन उडी मारली, पण सुदैवाने तरुण मंत्रालयात लावण्यात आलेल्या जाळीमध्ये अडकला आणि जीव वाचला.
मंत्रालयात याआधीही अनेकदा आत्महत्येचे प्रयत्न झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ही संरक्षक जाळी बसवण्यात आली होती. हा तरुण बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील आहे.बापू नारायण मोकाशी असं या तरुणाचं नाव आहे. 17 रोजी दुपारच्या सुमारास त्याने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षततेसाठी लावण्यात आलेल्या जाळीत तो अडकला आणि जीव वाचला. यानंतर पोलिसांना त्याला ताब्यात घेतलं असून उपचारासाठी रुग्णालयात पाठवलं आहे. रुग्णवाहिकेतून नेलं जात असताना त्याला आत्महत्येचा प्रयत्न करण्याचं कारण विचारण्यात आलं असता त्याने प्रेयसीवर बलात्कार झाला असून, न्याय मिळाला नसल्याचं म्हटलं.पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत.
Leave a comment