समाजसुधारक सदगुरू श्री वामनराव पै यांच्या बीड येथील जीवनविद्या मिशन शाखा यांच्या वतीने त्यांच्या अनुयायांनी युवकांसाठी आसाम येथील आयपीएस अधिकारी वैभव
निंबाळकर मी यशस्वी होणार या विषयावर व्याख्यानाचे आयोजन दि.16 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात करण्यात आले आहे.
समाजसुधारक थोर तत्वज्ञ सद्गुरू वामनराव पै यांच्या जाज्वल्य तत्वज्ञानाने देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचे अनुयायी तयार झाले असून या माध्यमातून समाजातील युवकांना
शिक्षणामध्ये योग्य दिशा मिळण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ञ अधिकारी यांच्या व्याख्यानाचे सातत्याने आयोजन केले जाते. यामध्ये पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी
असतील, महसूल प्रशासनातील अधिकारी असतील यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा युवकांना फायदा व्हावा व त्यांचा आदर्श घेवून त्यांच्या जीवना मध्ये परिवर्तन घडावे एवढा चांगला
उद्देश त्यांच्या माध्यमातून समाजामध्ये निरंतर राबवला जातो. बीड येथील युवकांना याचा लाभ व्हावा यासाठी आसाम येथील वैभव निंबाळकर या पोलिस अधिकार्याचे व्याख्यान
ठेवले आहे. वैभव निंबाळकर यांच्या बाबतीत महत्वाची बाब म्हणजे वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी पोलिस प्रशासनातील उच्च पद आपल्या विव्दतेच्या व कष्टाच्या जोरावर पदाक्रांत
केले अशा आदर्श कष्टाळू व्यक्तीचा अनुभवाचा युवकांना फायदा व्हावा यासाठी बीड जीवन विद्याशाखा यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम
निःशुल्क असून https://surveyheart.com/form/
समाजातील सर्वस्तरातील घटकांनी उपस्थित रहावे असे आवाहन जीवनविद्या मिशन बीड शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.
Leave a comment