बीड । वार्ताहर
खरीप 2022 पिक विमा भरलेल्या जिल्ह्यातील शेतक-यांनी पिकांची काढणी नंतर अथवा पिकात पाणी साचून जर नुकसान झाले असेल तर 72 तासात पिक विमा कंपनीकडे नुकसानीच्या फोटोसह ऑनलाइन तक्रार करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी
राधाबिनोद शर्मा यांनी केले आहे.
सध्या जिल्ह्यात सोयाबीन पिकाची काढणी सुरू आहे. सर्व शेतक-यांनी पिक काढणीनंतर पिकाचे सुरक्षित जागी योग्य व्यवस्थापन करावे. जे पीक काढणीला आलेले आहेत. त्याचे हवामान तज्ज्ञाच्या अंदाजानुसार पिक काढणीचे नियोजन करण्यात
यावे असे कळविले आहे.
यासाठी तालुका विमा प्रतिनिधी तसेच टोल फ्री क्रमांक यासोबत देण्यात आलेले आहेत. तरी दरम्यानच्या काळामध्ये नुकसानग्रस्त पीक विमाधारक शेतक-यांनी वेळीच तक्रारी दाखल कराव्यात.
तक्रार करण्यासाठी crop insurance हे App डाउनलोड करावे. अथवा बजाज एलियांज जीआईसी लिमिटेडचे नवीन फार्ममित्र-केयरिंगली योर्स अँड्रॉइडॲप डाउनलोड करावे. कंपनीचा टोल फ्री क्रमांक 1800-209-5959 ई-मेल - [email protected] असे आहे.
तालुका प्रतिनिधी यांचे क्रमांक पुढील प्रमाणे आहेत.
बीड - हनुमंत इन्कार मो. क्र. 919922999228, पाटोदा - संपद आश्रुबा गोल्हार – 9764552203, शिरूर कासार - गणेश विग्ने 919767355969 आष्टी - संजय पवार 917030241710, गेवराई -रामनाथ ढोबळे 917719959937, धारूर -
लखन मारळकर
919325003717, वडवणी - श्रीहरी गावाने 8805270533, आंबेजोगाई - रवी सावंत 919975192286, केज - नितीन पवार 918275708297, परळी वैजनाथ - भागवत अरुण डापकर-8830688898, माजलगाव - शेख झाहीर
919595259664, तसेच आपल्या तक्रारी
जिल्हा व्यवस्थापक (बीड) कविष उमक 7263977766, कुरेशी तौसीफ 8087624759, महावीर चिकटे 8482819082, तक्रार निवारण अधिकारी यांच्याकडे 919860191856 या मोबाईल क्रमांकावर मांडाव्यात.
Leave a comment