व्यापारी महासंघाची निवेदनाव्दारे मागणी
व्यापार्यांनी भगरीसह उत्कृष्ठ दर्जाचाच माल विक्री करावा
बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यातील गेवराई व बीड तालुक्यात भगरीतून शेकडो लोकांना विषबाधा झाल्याचे प्रकार समोर आले. त्यानंतर अन्न औषध प्रशासनाने भागरीचा साठा ताब्यात घेत व्यापार्यांवर कारवाई केली आहे. प्रशासनाच्या कारवाईवर व्यापार्यांचा आक्षेप नाही परंतु अन्न- औषध प्रशासनाने व्यापार्यांना पक्की पावती देऊन भागरीचा पुरवठा करणार्या नाशिकच्या फॅक्टरीला अगोदर सील करावे, असे आवाहन व्यापारी महासंघाने (कॅट) केले आहे.
याबाबत जिल्हा व्यापारी महासंघाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,राज्यात ठिकठिकाणी भागरीतून विषबाधा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे नवरात्र उत्सव होईपर्यंत राज्यात कोणत्याही व्यापार्याने भगर खरेदी अथवा विक्री करू नये. प्रशासनाला सहकार्य करावे. अनेक ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाने भागरीचा साठा जप्त करत व्यापार्यांवर केली आहे. प्रशासनाची कारवाई रास्त असली तरी कारवाई झालेले बीड, गेवराई, उमापूर येथील व्यापार्यांकडे नाशिकच्या फॅक्टरीचे पक्के बील आहे. यामुळे वापर्यांवर कारवाई करण्याअगोदर प्रशासनाने नाशिकची फॅक्टरी शील करून तेथील साठा ताब्यात घ्यावा. व्यापार्यांना निकृष्ट भागरीचा पुरवठा केल्याबद्दल त्या भगर उत्पादक फॅक्टरी मालकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी बीड जिल्हा व्यापारी महासंघ (कॅट) केली आहे.
व्यापार्यांनी प्रशासनास सहकार्य करा-सोहनी,पिंगळे
सध्या सर्वोत्तर नवरात्र उत्सव सुरू आहे. उपवासाचे दिवस असून निकृष्ट भगर खाल्ल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी विषबाधेच्या घटना घडल्या आहेत. यामुळे व्यापार्यांनी काळजी घ्यावी. लोकांच्या आरोग्याचा विचार करून भगर खरेदी- विक्री करू नये, असे आवाहन व्यापारी महासंघाचे संतोष सोहनी, विनोद पिंगळे, जवाहर कांकरिया, प्रमोद निनाळ यांनी केले आहे.
Leave a comment