बीड / प्रतिनिधी
बीडच्या भूमिपुत्राच्या सुराने अनेक पिढ्यांना विहार करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे, भरत अण्णा लोळगे म्हणजे बीडच्या संगीत विश्वातला लुकलुकणारा तारा असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी काढले आहे
प्रारंभी रामायनाचार्य रामाराव ढोक महाराज, व बीडचे नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर आदि मान्यवराच्या हस्ते दिपप्रज्वलीत करण्यात आला तर सुवर्ण फुलाचा वर्षाव करण्यात आला,यावेळी प्राचार्या दिपाताई क्षीरसागर, युवानेते डॉ योगेश क्षीरसागर, ऍड कालिदास थिगळे,अरुण डाके,डॉ अरुण भस्मे,आदि उपस्थित होते
यावेळी पैठणचे नगराध्यक्ष सुरजराव लोळगे,अरुण डाके,सभापती दिनकर कदम,ता.दुध संघ अध्यक्ष विलास बडगे,नगरसेवक विलास विधाते,राजेश क्षीरसागर,रवी मानुरकर,डॉ अरुण भस्मे,सुभाषराव सारडा,विलासराव भांबुर्डकर,सुहासराव बार्शी कर, रावसाहेब टाक, किरण शेठ आळंदीकर, रामशेठ मैड, दिलीप शेठ नागरे, राजेंद्र शेठ लोळगे, शशीकांतराव उदावंत,औदुंबर राव बागडे,जे बी सराफ, संपादक प्रभाकरराव कुलथे, संपादक सुनीलराव गावरस्कर, सुनीलशेठ मानुरकर, रविशेठ डहाळे, गोरखशेठ बेदरे विजुशेठ कुलथे, अनीलराव जोजारे, देवाशेठ मानुरकर, सुधाकरराव दहिवाळ, गणेशराव बागडे,वैभवराव शहाणे,इसाकसर,खानसर आदि मान्यवर देखील उपस्थित होते
लोळगे कुटूंबाच्या हस्ते केक कापण्यात आला,यावेळी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते जेष्ठ गायक भरत आण्णा लोळगे यांचा सत्कार करण्यात आला,यावेळी बोलताना माजीमंत्री क्षीरसागर म्हणाले की, बीड जिल्हा हा अनेक कलाकारांची खाण असलेला जिल्हा आहे या ठिकाणी विविध क्षेत्रातील कलावंत राज्यात आणि राज्याच्या बाहेरच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्या कलेचा अविष्कार प्रगट करून बीड जिल्ह्याचा नावलौकिक गाजवत आहेत बीडच्या भूमिपुत्राच्या सुराने अनेक पिढ्यांना विहार करण्याची संधी उपलब्ध केली आहे
ज्येष्ठ गायक भरतआण्णा लोळगे यांचा आज 75 वा अमृत महोत्सव साजरा केला जातो योगायोगाने देशाचाही अमृत महोत्सव साजरा होत आहे हा योगायोग आहे या ठिकाणी त्यांचे चाहते मित्र मंडळ राज्यभरातून आले आहेत त्यांच्या आवाजावर फिदा असणारी अनेक श्रोते आजही त्यांच्या मैफिलीला उपस्थिती दर्शवतात अण्णांसारखे व्यक्तिमत्व हा बीडच्या कोंदनातील हिरा आहे, विविध गाणी अभंग गवळणी भारुड अशा अनेक गीतांना स्वतःच्या गळ्यात बसून त्याचे सादरीकरण मैफलित करत लोळगे यांनी अनेक मैफिली गाजवल्या आहेत, शून्यातून विश्व निर्मिती करत अनेक व्यवसायात यश मिळवून आता इतरांना अलंकारिक करण्याचा व्यवसाय ते करत आहेत अनेक गायकांच्या गीतांना पुन्हा प्रत्यक्ष त्यांच्या सुरातून ऐकण्याची संधी बीडकरांना मिळते आहे भरत आण्णा लोळगे म्हणजे बीडच्या समृद्धीत लुकलुकणारा तारा असून आजचा दिवस चांगला आहे ही भावना लक्षात घेऊन जीवनाचा आनंद घ्यायला हवा चिंतेने जगणारा माणूस कधीच सुखाने झोपू शकत नाही त्यामुळे संगीत हे एक असे माध्यम आहे की ते दुःख विसरून चांगले जीवन जगण्यासाठी प्रेरणा देते. बीडचा नावलौकिक आणखी वाढवून त्यांनी शंभरी पार करावी अशा शुभेच्छा ही माजी मंत्री क्षीरसागर यांनी दिल्या
यावेळी लोळगे परिवाराच्यावतीने माजी मंत्री क्षीरसागर यांचे भव्य स्वागत करण्यात आले,यावेळी संस्कार भारतीचे सर्व पदाधिकारी, हजारो नागरिक,रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते
Leave a comment