आज दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
बीड | वार्ताहर
शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार विनायकराव मेटे यांचे 14 ऑगस्ट रोजी रस्ते अपघातात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज 15 ऑगस्ट रोजी दुपारी बीड येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तत्पूर्वी नगर रोडवरील शिवसंग्राम भवन येथे त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले.या ठिकाणी अंतिम दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
शहरातील नगर रोड येथील शिवसंग्राम भवन पासून अंत्ययात्रेला सुरुवात झाली असून आज दुपारी विनायकराव मेटे यांच्या पार्थिवावर जालना रोड भागातील रिलायन्स पेट्रोल पंपाच्या पाठीमागील शेतात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कृषी मंत्री अब्दुल सत्तार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह अन्य मंत्री सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातील नागरिक उपस्थित राहणार आहेत.
Leave a comment