बीड । वार्ताहर
बीड शहरात सुभाष रोडवरील अमृत मंगल कार्यालयात चतर्विध संघ चातुर्मास 2022 च्या ठिकाणी प.पु.प्रणव मुनीजी व प.पु.किरणसुधाजी म.सा. प.पू विशाल प्रभाजी म. सा. आदी ठाणा 8 त्यांच्या आशिर्वादाने आणि बीडची कन्या प. पू. प्राप्तिश्रीजी म.सा, प.पू.प्राचीश्रीजी म.सा यांच्या मार्गदर्शनाखाली दि.14 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच तत्पुर्वी दि.13 ऑगस्ट रोजी सायं 7 ते 10 या वेळेत लविना जैन इव्हेन्ट लवकुश,पुणे संचलित ‘भक्ती संध्या’ कार्यक्रम संपन्न होणार आहे. राखी एक रक्षा सूत्र आहे, ज्याचा उल्लेख प्रत्येक धर्मातील पौराणिक कथेत आहे. राखी हे एक पवित्र बंधन आहे. जे अमर, शाश्वत आहे. अशा या सामूहिक रक्षाबंधन आणि भक्ती संध्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सुशील खटोड, मदन दुग्गड, शितल नहार, प्रतीक बाफना, महेंद्र दुग्गड, सुनील कोटेचा, दीपक आब्बड महावीर बोरा, संकेत नहार, तुषार बरेलोट यांनी केले आहे.
Leave a comment